प्रसंग पंधरावा - गुरुनिंदा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


नारदें सद्‌गुरु केला कोळी । निंदा प्रसवली हृदयकमळी । जोडिली चौर्‍यांशी लक्ष नवाळी । कृष्‍ण म्‍हणे नारदा ॥४७॥
निज निंदेचें कर्म जाल्‍या गहन । तें सद्‌गुरुवचनें होय दहन । गुरुची निंदा गुरूस गेल्‍या शरण । उपाय रचतील ॥४८॥
कृष्‍ण म्‍हणे हो नारदमुनी । तुमची पापें ना फिटेत मजलागुनी । तुम्‍ही प्रार्था ढीवरालागुनी । साष्‍टांग अष्‍टभावें ॥४९॥
मग नमस्‍कार करूनी नारदमुनी । सद्‌गुरुकृपें आलें तत्‍क्षणीं । लोटांगण घातलें भाव धरूनी । अहंकाराविण ॥५०॥
मग सद्‌गुरु बोलिलें वचन । मी पुर्वीं तुज दिसें ढीवरपण । उपदेश घेऊनि निंदा घडली जाण । संकल्‍प विकल्‍पासंगें ॥५१॥
मग लक्ष चौर्‍यांशीची झडती । नांवें लिहूनियां निगुती । नारदाची समुळ भ्रांति । फेडिली परियेसा ॥५२॥
सद्‌गुरु बाळा भोळा वेडेपणें । शिष्‍यांनीं वंदावा एकविधपणें । भाव धरिल्‍या तुटती बंधनें । चौर्‍यांशी दुःखांचीं ॥५३॥
सद्‌गुरुनिंदेचें एक उत्तर । पापें फिटेत ना पूजिल्‍या ईश्र्वर । काशिवास तुळापूर केल्‍या अपार । ना फिटती वज्रलेपें ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP