प्रसंग पंधरावा - अहंकार दमन

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


संत महंतांस माझा नमस्‍कार । आधीं मारावा मूळ अहंकार । मग मनावरी होऊनि स्‍वार । निजपद जिंकावें ॥४०॥
हातीं आलें नसतां मन । नानापरी घेतील आवरण । तों तों चढे मीपण दूषण । मी महंत म्‍हणवितां ॥४१॥
आपली शुद्धि आपण घेतली नाहीं । तंव शिष्‍य करणें अप्रतिष्‍ठा पाहीं । पापें फेडावया प्रयत्‍न नाहीं । गुरुत्‍व ठावें नसतां ॥४२॥
त्‍यानें बुडतां तारावा वचनीं । हें गीतेंत बोले चक्रपाणी । आपल्‍या पुरतेपणावांचुनी । शिष्‍य न करावे ॥४३॥
जे जे करतील पापें । तेणें दोहींस होतीं वज्रलेपें । प्रयत्‍न नाहीं केल्‍या तीर्थ जपें । धुवट होई ना ॥४४॥
पहा आपल्‍यास आपणें । वोळखोनियां शूपरणें । तैसें वोळखोन अंगिकारणें । द्वैताचें अद्वैत होय ॥४५॥
सद्‌गुरु करून गुरुनिंदा घडे । तरी एके जन्मीं चौर्‍यांशी लक्ष जोडे । घोरांदर चुकावया तीर्थ न सांपडे । एका सद्‌गुरुविण ॥४६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP