प्रसंग पंधरावा - वासना-मुरळी

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


मागें राहिले होतें अनुसंधान । जनांचें पाखांड भूतें भजन । तें अवधारा पुढें सांगेन । श्रोत्‍या प्रश्र्निकां ॥८॥
मुरळी म्‍हणजे कल्‍पना । श्रीहरि नये तिच्या अगुणा । जन विषयलंपट जाणा । तिच्या गुणासंगें ॥९॥
सडे संमार्जन घातली रांगोळी । बैसों जातां करोनि आंघोळी । तें वासना करी रवंदळी । स्‍वयें पांचाहिन ॥१०॥
ऐसी मुरळी अंगसंगें उदास । वागवूनि म्‍हणविती हरिदास । ते सर्व विधीचा करी नास । चहूं अवस्‍थांमाजी ॥११॥
मुरळी वासना अविचारीण । तिच्यासंगें देवीदेवतां भजन । ते उघड करून सांगेन । सभे श्रोत्‍यालागीं ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP