प्रसंग पंधरावा - वासनेसंगें अविचारी देवतांभजन

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


पुजितील कोंकणांतील वाग्‍जाई । तिला म्‍हणती तूंचि माझी आई । तुजवांचुनि अणिकांचे सोयी । मी न लगे वो माते ॥१३॥
घडिक म्‍हणवी नवलाईचा । म्‍हणे मज शुद्ध देई वाचा । तुजविण मी आणिकांचा । न म्‍हणवी वो माते ॥१४॥
भद्राई लावावें आपुलें वळी । तुला नैवेद्य करीन तूप पोळी । म्‍हणें मज पाव वो तत्‍काळीं । कोंबडें कोंबड्या मारीन ॥१५॥
मग धांवती गौडदेशा । नानापरी चेटकें शिकती परियेसा । म्‍हसके होऊनि येती देशा । जन झकवावयालागी ॥१६॥
चेडें चापडें जड्या बुट्या कुसळणें । शिकोनि अधर्मी गोंविली अज्ञानें । त्‍यांनीं दुभत्‍याचा नाश करणें । शुकर होऊनी उसनें देती ॥१७॥
भूषण वाढवावया कारण । करिती भूतांचें आराधन । त्‍याकून आणवितीं चोरून । सिद्ध म्‍हणविती आपणातें ॥१८॥
मेल्‍या बाळंतिणीचीं वोहोरें पोरें । त्‍यांचे साधून काढिती टकोरें । ते जन्म घेती विपारें उसणें द्यावयालागीं ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP