असंगृहीत कविता - अर्पण श्लोक

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


‘ सौजन्यें मज वाढवून जगतीं
केलेंस आई, सुखी,
राही दृष्टि तुझी सदा मजवरी
विद्यैषणा - कौतुकी;
ज्ञानाचे कण हे श्रमें जमविले --
गे कोण यांना बघे ? --
अर्पीं मी तुज साभिवन्दन अता,
हा ‘ आमुचा गांव ’ घे !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP