असंगृहीत कविता - ऐका निमिषाचें स्मारक
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
वृत्त : नृपममता
जें आन येइ जन्मास
पावेल कधि तरी खास
विलय तें.
हांसवी आज कालाला
तें उद्यास रडवायाला
ना चुके.
मन्दानिल आज बहारी
तो झन्झावात विषारी
हो उद्या.
बदल हा क्रूर सुल्तान
बलवन्त आणि बेमान,
तद्राज्याला सीमा न
मानिनी ! १
तव नयनिं दिसे या समयीं
उचमळे जें तुझ्या हृदयीं
सारखें;
तू प्रेम करून कबूल
केसांतिल चम्पक फ़ूल
अर्पिशी;
ह्र्दयाचें वाजे बीन
राणी तू तक्त - नशीन
कान दे;
हें स्मारक या निमिषाचें
हें परस्पर प्रेमाचें
उभविलें काव्यहेमाचें
मानिनी ! २
काव्यरत्नावली सप्टेंबर १९२४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP