असंगृहीत कविता - स्फ़ुट श्लोक
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
दूर घालवी कोण आपदा,
वन्दितों सदा मी तिच्या पदां;
स्वर्विलासिनी काव्यशारदा,
जाणती कवि हीस कामदा १
प्रकट दाविशी भाव कां दुजा ?
मधुर भामिनी, राग हा तुझा.
कवण वाढवी प्रीतिच्या मदा ?
तव विरक्ति जी शुद्धकामदा २
नसतां शशि, रात्र-सुन्दरी
नवरत्नीं सजतेच शोभिनी
अनलंकृत राहुनी परी
झुरते तीच खरी वियोगिनी ३
काव्यरत्नावली, नोव्हेम्बर १९२६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP