उत्तरमेघ - श्लोक ८१ ते ८५

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(८१) श्यामा देखें, तव तनुच कीं; एणिनेत्रीं कटाक्ष: ।
चंद्रीं वक्त्रद्युतिहि: शिखिच्या बर्हभारांत केश: ॥
भ्रूभंगांचा तटिनिलहरी भास देती कसाही ।
चण्डी ! एकांतहि परि तुझें साम्य सम्पूर्ण नाहीं ॥

(८२) पाषाणीं तूं प्रणयकुपिता गैरिकें रेखियेली ।
काढूं पाहें ज तव पदीं नम्रसा त्याचवेळीं ॥
बाष्पावेग प्रबल मम तों द्दष्टि झांकोनि टाकी ।
चित्रींही ना हतविधि सहे आपुल्या संगमा कीं ॥

(८३) मी आकाशीं भुज पसरितां गाढ आलिंगण्यातें ।
तूतें, कष्टें दिससि कधिंही जेधवां स्वप्निं मातें ॥
ऐशा दीना बघुनि बहुधा देवताही वनांत ।
मोत्यें जैसीं, तरुकिसलयीं आसवें ढाळितात ॥

(८४) भेदूनीयां नवकिसलयां देवदारुद्रुमांच्या ।
तद्नंधानें दरवळुनियां, दक्षिणे वाहती ज्या ॥
वातोमीं, त्या तुहिनगिरिच्या सेवुनी सौख्य मानी ।
काया पूर्वीं, गुणवति ! तुझी स्पर्शिली कीं तयांनीं ॥

(८५) श्यामास्वङ्गं चकितहरिणीप्रेक्षणे द्दष्टिपातं
वक्त्रच्छायां शशिनि शिखिनां बर्हभारेषु केशान् ।
उत्पश्यामि प्रतनुषु नदीवीचिषु भ्रूविलासान्हन्तैकस्मिन्क्वचिदपि
न ते चण्डि साद्दश्यमस्ति ॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP