उत्तरमेघ - श्लोक १ ते ५
महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.
(१) विद्युत्कल्पा युवति, हरिचें चापसा चित्रसंघ ।
त्वद्रंभीरध्वनिपरि जिथें वाजताती मृदंग ॥
भूभागींचे मणि तव पयोतुल्य तेजाळ पाहीं ।
वाडे स्पर्धा करिति तव कीं, तुंग, ऐशा उपायीं ॥
(२) हातीं लीलाकमल, अलकीं गुंफिलें कुंद ताजें ।
गालीं लोध्रप्रसवरजजा, पांडुताही विराजे ॥
केशप्रान्तीं कुरबक नवें, कर्णिं शोभे शिरीष।
भांगीं नीप, प्रसव तव, हा नारिंचा जेथ वेष ॥
(३) जेथें जाती स्फटिकविमलीं यक्ष सौधाग्रभागीं ।
ताराबिंबीं रचितसुम जे, घेउनीयां शुभांगी ॥
पीती मोदें रतिफलसुरा, कल्पवृक्षें दिली जे ।
वाजे जेव्हां मृदु मुरज, कीं ध्वान तूझेंचि गाजे ॥
(४) श्री - गंगेच्या शिशिरपवनीं शीण जाई जयांचा ।
मंदारांनीं, तदिय तटिंच्या, ताप वारावयाचा ॥
क्रीडालोला, कनकसिकतामुष्टिनीं झांकुनीयां ।
रत्नें, जेथें हुडकिति सुरप्रार्थिता यक्षकन्या ॥
(५) विद्युत्त्वन्तं ललितवनिता: सेन्द्रचापं सचित्रा:
संगीताय प्रहतमुरजा: स्निग्धगम्भीरघोषम् ।
अन्तस्तोयं मणिमयभुवस्तुङ्गमभ्रंलिहाग्रा:
प्रासादास्त्वां तुलयितुमलं यत्र तैस्तैर्विशेषै: ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP