उत्तरमेघ - श्लोक २६ ते ३०

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(२६) वापी चास्मिन्मरकतशिलाबद्धसोपानमार्गा
हैमैश्छन्ना विकचकमलै: स्निग्धवैदूर्यनालै: ।
यस्यास्तोये कृतवसतयो मानसं सन्निकृष्टं
नाध्यास्यन्ति व्यपगतशुचस्त्वामपि प्रेक्ष्य हंसा: ॥

(२७) तीच्या तीरावरि बनविला विश्रमा एक शैल ।
भोंतीं ज्याच्या कनककदली, शेखरीं इन्द्रनील ॥
आजूबाजू बिजली चकके, पाहुनी ऐसियातें ।
तूतें, कान्ताप्रिय बहुत जो, आठवीं मी तयातें ॥

(२८) रक्ताशोका चलदल, तसे कान्तसा केसराला ।
कोरांटीची वइ वळि जिथें माधवीमंडपाला ॥
पाहें तेथें; करित सखिचा एक पादाभिलाष ।
आयासी तद्वदनमदिरापानवांछा दुज्यास ॥

(२९) आहे तेथें स्फटिकफलकीं रोंविला हेमदंड ।
ज्याच्या मूलीं दिसत हिरवेचारसे रत्नखंड ॥
नाचे तालें वलयरणितें जो प्रियेच्या समोर ।
जेथें बैसे दिवस सरतां तो तुझा मित्र मोर ॥

(३०) ऐशा, साधो ! सदन अमुचें ओळखावें खुणांनीं ।
तैसे द्वाराजवळि लिहिलीं शंखपद्में बघूनी ॥
तेथें जातां तुज अवकळा निश्चयें, बा ! दिसेल ।
अस्ता जातां रवि, कमल तें कां न दैन्या वरील ? ॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP