उत्तरमेघ - श्लोक ४१ ते ४५

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(४१) तां जानीथा: परिमितकथां जीवितं मे द्वितीयं
दूरीभूते मयि सहचरे चक्रवाकीमिवैकाम् ।
गाढोत्कण्ठां गुरुषु दिवसेष्वेषु गच्छत्सु बालां
जातां मन्ये शिशिरमथितां पद्मिनीं वान्यरूपाम् ॥

(४२) नूनं तस्या: प्रबलरुदितोच्छूननेत्रं प्रियाया
नि:श्वासानामशिशिरतया भिन्नवर्णाधरोष्ठम् ।
हस्तन्यस्तं मुखमसकलव्यक्ति लम्बालकत्वादिन्दोर्दैन्यं
त्वदनुसरणक्लिष्टकान्तेर्बिभर्ति ॥

(४३) तेथें तीतें बघसि बहुधा व्यग्र देवार्चनीं कीं ।
किंवा माझें विरहकृशसें कल्पनाचित्र रेखी ॥
मैना मंजुस्वनि भवनिं जी, कौतुकें तीस बाही: - ।
“ आहे कांहीं स्मरण पतिचें ? तत्प्रिया तूंहि बाई ” ॥

(४४) किंवा वीणा, मलिनवसना, मांडिये घेउनीया ।
माझ्या नांवावरि रचियलें सिद्ध जों गीत गाया ॥
तारा ओल्या नयनसलिलें, त्यां पुसोनीं कसेंही ।
ताना गाल्या फिरफिरुनि, जी विस्मरोनीच जाई ॥

(४५) शापांताचे विरहदिवसापासुनी, शेष मास ।
मोजी भूमीवरि रचुनियां देहलीच्या फुलांस ॥
मत्संगा वा मनिं अनुभवी, कल्पनेनें सुखावे ।
स्त्रीव्यापार प्रियविरहिं हे, होति सर्वांस ठावे ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP