समासोक्ति अलंकार - लक्षण ३
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
“ ‘निशामुखं चुम्बति चंद्र एष: ’ [ (१) रात्रीच्या प्रारंभाला चंद्र बिलगतो (२) चंद्र रात्रीचें चुंबन घेतो.] या वाक्यांत निशा व चंद्र ही पदें श्लिष्ट नसल्यानें, व केवळ मुखचुंबन हें पुत्र वगैरेंच्या बाबतींतही साधारण असल्यानें (म्ह० चुंबन मुलाचेंही होऊं शकतें. तेव्हां नायिकेचेंच चुंबन असा निश्चित अर्थ या वाक्यांतून निघत नसल्यानें) मुखचुंबन ह्या अर्थावरून, नायक व नायिका यांचा निश्चितपणानें आक्षेप कसा होऊं शकेल ? अथवा (नायक व नायिका यांचा आक्षेप होतो असें घटकाभर मानलें तरी) आक्षिप्त जीं नायकनायिका त्यांचा चंद्र व निशा यांच्याशींच अभेदान्वय होतो, आणि चुंबनाशीं भेदानें अन्वय होत नाहीं हें तरी कशावरून ? (याला तरी प्रमाण काय ?) आणि (व्युत्पत्तीच्या नियमाप्रमाणें) नायकनायिकांचा फक्त चुंबनाशीं अन्वय झाला तर (तथात्वें), चंद्र व निशा यांचा नायकनायिकाशीं अभेदसंबंध होणार नाहीं, व मग (नायकता - ताटस्थ्ये) शृंगररसाचा अर्थ येथें प्रकट न होण्याचा प्रसंग येईल. म्हणून ‘निशामुखं चुम्बति चंन्द्रिकैषा’ (या ठिकाणीं चंद्रिका म्ह० चांदणें हा शब्द स्त्रीलिंगी असल्यानें, त्यातून नायकाची प्रतीति होणारच नाहीं.) व ‘अहर्भुखं चुम्बति चण्डभानु:’ (सूर्य सकाळच्या वेळेला स्पर्श करतो.) येथेंही कर्ता व कर्म पुल्लिंगी असल्यानें नायक व नायिकेची प्रतीति होत नाहीं.) पण वरील वाक्यांत प्रतीत न होणारे नायकत्व व नायिकात्व प्रस्तुत (निशामुखं चुम्बति एष:) वाक्यांत निशा या आकारांत स्त्रीलिंगी शब्दातील टाप् या स्त्रीलिंगी प्रत्ययानें, व चंद्र या प्रातिपदिकांच्या अर्थांतील) स्त्रीलिंगानें व पुल्लिंगानें, (अनुक्रमें) त्या प्रत्यय, विभक्ति वगैरेंचें जे अधिकार - निशा व चंद्र हें पदार्थ - त्यांच्या ठिकाणीं (अनुक्रमें नायिकात्व व नायकत्व) सूचित होतें. (व्यंजनाव्यापारानेंच; आक्षेपानें नव्हे.) अशा रीतीनें निशा व चंद्र यांच्या ठिकाणीं नायकत्व सिद्ध झालें तें (ह्या ठिकाणीं टाप प्रत्यय व प्रथमा विभक्ति याद्वारा; तर) कुठेंकुठें श्लिष्ट निशेषणांनींही प्रतीत होतें; पण तेथेंही अप्रकृत अर्थाचा बोध व्यंजनाव्यापारानेंच होतो. कारण अशा ठिकाणीं, अभिधाशक्तीचें प्रकरण वगैरेंमुळें नियंत्रण झलेलें असतें. अशा तर्हेनें व्यंजनाच्या माहात्म्यानेंच अप्रकृत वाक्यार्थाशीं तादात्म्य पावूनच प्रकृत वाक्यार्थ राहतो. (आतां येथें अप्रकृत वाक्यार्थ, व्यंजनेनें बोधित होत असल्यानें, व तो प्रकृत वाच्यार्थाला साहाय्य करीत असल्यानें,) येथें होणारी समासोक्ति (अपरांग नांवाचा) गुणीभूत व्यंग्याचाच एक प्रकार आहे, असें म्हणणें हाच रमणीय़ मार्ग.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP