स्तुतिपर अभंग - अभंग ११ ते १३
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
११) श्रीरामनामें तारिले पाषाण । नामाचें महिमान कोण जाणें ॥१॥
उफराट नामें तारियेला कोळी । दोष जाहले होळी रामनामें ॥२॥
तारियेली गणिका तारियेली देखा । पवित्र तो चोखा रामनामें ॥३॥
एका जानार्दनीं रामनाम जप । पवित्र तें देख रामनाम ॥४॥
१२) अनुभवें नाम गाताती गणिका । मोक्षपद देखा प्राप्त जालें ॥१॥
उलटया अक्षरीं वाल्हा तो तरला । उद्धार तो केला चोखियाचा ॥२॥
यातीसी संबंध नाहीं नामस्मरणीं । जपोत पैं कोणी आदरें नाम ॥३॥
जनार्दनीं एका सांगतसे खूप । श्रीरामनाम पूर्ण सोडूं नये ॥४॥
१३) चोखियाची भक्ति कैसी । प्रेमें आवड देवासी ॥१॥
ढोरें वोढी त्याचे घरीं । नीच काम सर्व करी ॥२॥
त्याचे स्त्रीचे स्त्रीचें बाळंतपण । स्वयें करी जनार्दन ॥३॥
ऐसी आवड भक्ताची देखा । देव भुलले तया सुखा ॥४॥
नीच याती न मनीं कांहीं । एकाजनार्दनीं भुलला पाहीं ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : July 10, 2014
TOP