श्रीमदनंताची आरती

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

श्रीमदनंत न अंत जया तो संत कृपे प्रघटला हो ॥ धृ० ॥
आसनिं शोभे त्रिभुवन नायक, भक्तजनाला निजसुख दायक । ओंवाळा आरती तयाला । सुयोग हा लाभला हो ॥ श्री० ॥१॥
बहु जन्मार्जित पुण्यें फळली, देहभावना विस्मृति पळली । गळली अहंकृति मिळलि आम्हांला अद्वय चिन्मय कहा हो ॥ श्री० ॥२॥
करा भजन जय रामकृष्ण हरि, निश्चय प्रेमा धरुनि अंतरिं । पायीं घागर्‍या हातिं चिपळ्या नाचत नाचत चला हो ॥ श्री० ३॥
मनीं धरुनि सद्‌गुरु चरणांबुज, विनवी कर जोहुनि कृष्णात्मज । चला शरण श्री रमारमणपदीं सुदिन अजिचा भला हो ॥ श्री० ॥४॥
गजर १ ला.
शिव पार्वती तनयाला । प्रेमें करूं नमनाला । संरक्षि निज भजकांला । निवटूनियां असुरांला ॥ चाल ॥
मरण जनन हर पद ज्याचें  । भजन रजनि दिन करूं त्यांचें ॥ पूर्वचाल ॥
ह्रदयीं स्मरुनि सदयाला । गाऊं धरुनि विनयाला ॥१॥
गजर २ रा.
चला चला चला श्रीराम दर्शना चला । भला भला सुयोग हा आम्हांसि लाभला ॥
श्रीराम राम राम राम राम हरि वदा । दुरित सकल हरुनी दाविल आपुल्या पदा ॥१॥
गजर ३ रा.
जाऊं चला पाहूं नयनिं सीताधवा श्रीराघवा ॥ धृ० ॥
भावभास परिहारी । निजदास जन तारी । गाऊं तयाचें नाम वदनीं काम पुरवी आघवा ॥१॥
गजर ४ था.
त्या प्रेमें श्रीहरिला, ह्रदयिं धरिला । निज जनन मरण हरण्यासि सदा ज्या भक्तजनीं वरिला ॥ चाल ॥
चक्रानें नक्रा चिरिला । सोडविलें संकटिं करिला । निजपद देउनि उद्धरिला ॥ पूर्वचाला ॥
भवभस सर्व हरिला । दासीं स्मरिका ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP