श्रीकमलानाथतीर्थ पद
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद ३५. वें.
श्रीमदिंदिराकांत शिष्य श्रीकमलानाथां पाहूंया । ठेउनि चरणीं मस्तक भावें भक्तिसुखामृत लाहूंया ॥ धृ० ॥
सज्जन थाटें जातां वाटे रामकृष्ण हरि गाऊंया । भवभय हारक गुरुवर तारक । प्रेमें ह्रदयीं भावृंया ॥ श्रीम० ॥१॥
दुस्तरमाया तरुनीजाया श्रीगुरु सन्निध राहूंया । मिथ्या मीपण समजुनि तत्पदिं तनुमन धन हें वाहूंया ॥ श्रीम० ॥२॥
वैष्णव जन ज्या मार्गें गेले त्या शुभ पंथें जाऊंया । वदत कृष्ण सुत साधुनि निजहित श्रीविठ्ठल पद पावूंया ॥ श्रीम० ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2014
TOP