श्रीकृष्ण महाराज बांदकर

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद ३६. वें.
आले वैष्णव सद्नुरु श्रीमत्‌ कृष्ण दयाघन उदयाला । मोहपसारा वारुनि केला, आनंदचि या समयाला ॥ धृ० ॥
अवतरले अद्वय पथरूपें, ताराया जडजीवांला । जोडुनियांकर नमितों भावें. चिन्मयपद राजीवांला ॥ आले० ॥१॥
केलें मुक्त जनांला पाजुनि, स्वरुप सुखामृत बोधाला । विस्मृतिला ग्रासुनियां दाविति, अनुपम अक्षय स्वपदाला ॥ आले० ॥२॥
ज्यांचें गळलें मीपण सारें, येइल हा अनुभव त्यांला । दास कृष्ण सुत कथितों ऐसें, प्रत्यय घेउनि सर्वांला ॥ आले० ॥३॥
पद ३७. वें.
सुदिन गमे मज आजि खरा हा लाभ जाहला हरिभजनाचा ॥ धृ० ॥
सर्व मिळुनि आम्ही नाचूं प्रेमें, होय भला उत्साह मनाचा । अमित सुकृत जरि पदरिं असे तरि, घडतें दर्शन भक्तजनाचें । हें मज
कळलें पुण्यचि फळलें, मीपण गळलें जड देहाचें ॥ चाल ॥
जयहरि विठ्ठल नाम गजर हा, तारक निश्चय हा साचा ॥ सु० ॥१॥
मिथ्या माया भज रघुराया, पार कराया हा भव सिंधु । प्रतिपालक जो भक्त जनाचा, कोणि नसे यासम दीन बंधु । जनन मरण हर अभय वरदकर, चिन्मय तनु जो आनंदकंदु । मुनि सनकादिक, नृपजनकादिक स्मरती त्या कर जोडुनी वंदुं ॥ चाल ॥
कृष्णात्मज या रंगिं रंगला, दास रघूत्तम चरणाचा ॥ सु० ॥२॥
पद ३८. वें.
टाळ धरुनियां बाळ सकळ हो, खेळखेळुंया परमार्थाचा ॥ धृ० ॥
संत जनाचा पंथ विवरुनि, योग साधुंया स्वस्वरूपाचा । कांहिं न केलें वय हें गेलें, ध्यास विवरुनि, योग साधुंया स्वस्वरूपाचा । कांहिं न केलें वय हें गेलें. ध्यास धरुनियां बहु विषयांचा ॥ चाला ॥
आतां होउनि सावध सेवूं, प्रसाद श्रीगुरुचरणाचा ॥ टाळ० ॥१॥
वाळपणी खेळांत रंगलों, तरुणपणीं संगम तरुणीचा । वृद्धपणीं तिळ सौख्य न कांहीं, राहि न कोणी जवळीं साचा । चावाया नच दंत मुखांतुनीं लाळ गळे ती बोबडि वाचा ॥ चाल ॥
या परि तीन दशा या जाती, व्यर्थचि योग न स्वसुखाचा ॥ टाळ० ॥२॥
तरि सावध व्हा या बाळांनों, गाउनियां श्रीहरि गुण नाचा । करिल कृपा श्रीराम आम्हांवरि, अभिमानी जो भक्तजनांचा । निज सुख मेवा देउनि सेवा घडविल, भम हा हरिल मनाचा ॥ चाल ॥ जोडुनियां कर मागतसे वर, संग कृष्ण सुत सुजनांचा ॥ टाळ० ॥३॥
चला अयोध्येसि जाऊं । रघुराज नयनिं पाहूं ॥ विनवितसे कृष्ण तनय निज आत्मभाग्य लाहूं ॥ आ० ॥४॥
पद ३९. वें.
आजि धन्य दिवस कळला । मज भक्तसमुह मिळला । लोळेन या संतचरणिं अभिमान सर्व गळला ॥ धृ० ॥
वाजवुनि टाळ हातीं  । मुखिं रामकृष्ण गाती । भजनीं या त्रासद बहु षट्‌ शत्रु पळुनि जती ॥ आ० ॥१॥
घरदार सर्व खोटें । देईच दु:ख मोठें ॥ श्रीहरिच्या चरणा वांचुनि सौख्य नाहिं कोठें ॥ आ० ॥२॥
मिळुनियां एक मेळा । गाऊं राम वेळोंवेळां ॥ नाचत या एकसारिखे मांहुनियां खेळा ॥ आ० ॥३॥
चला अयोध्येसि जाऊं । रघुराज नयनिं पाहूं ॥ विनवितसे कृष्ण तनय निज आत्मभाग्य लाहूं ॥ आ० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP