श्रीबजरंगबलीचें पद
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद ३०. वें.
बलभीमा भजनिं प्रेमा दे करुणाघना ॥ धृ० ॥
करीं दुरित भंगा । लाविं संत संगा । बजरंगा या मना ॥ ब० दे क० ॥१॥
आत्मकृपा व्हावी । कीर्ति तुझी गावी । पुरवींहे कामना ॥ ब० दे क० ॥२॥
कृष्णतनय याची । विषय बंधनाची । नुरवावी वासना ॥ ब० दे क० ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2014
TOP