श्रीनरहरिरायाचें पद

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद २२. वे. अर्पिली चरणिं हे काया । मज तारीं नरहरिराया ॥ धृ० ॥
कुलदेव आमुचा कळला । प्रेमभाव ह्रदयीं बळला । बहु जन्म घेउनी मळला जीव हा तवपदीं वळला ॥ चाला ॥
तूं तारक एकचि साचा । हा निश्चय जाण मनाचा । मज लाविं छंद भजनाचा ॥ बहु आवडि तव गुण गाया ॥ अ० मजतारीं० ॥१॥
प्रर्‍हाद भक्त तुज स्मरला । म्हणुनि तुं स्तंभिं गुरगुरला । त्रिजगांत भरुनि जो उरला । होउनि सगुण अवतरला ॥ चाल ॥
तुज काय कठिणजी देवा । मजकडुनि घेइं निज सेवा । दे प्रेम भक्ति रस मेवा । पथ अन्य न गमत तराया ॥ अ० मजतारीं० ॥२॥
अन्न वस्त्र देउनि साचें । कल्याण करीं सर्वांचें । मागणें हेंचि प्रेमाचें । कथिलें तुज कृष्ण सुताचें ॥ चाल ॥
नयनीं निजरूप पहावें । स्वरूपीं स्थिर चित्त रहावें । भवसागर तरुनी जावें । कर जोडूनि वंदन पाया ॥ अपिली० मज तारीं० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP