श्रीशांतादुर्गेचें पद

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद २३. वें.
शांताविजयादुर्गा मजला । देउनि विजया रक्षिति अनुदिनी ॥ धृ० ॥
श्रीनरसिंह दयाघन राघव । वेंकटरमण पदाब्जीं रमउनी ॥ शांता० ॥१॥
भीति न तुजला रीति अशी ही । कळविलि प्रीती लाउनि भजनीं ॥ शांता ॥२॥
त्रिजगन्माता चरणीं जोडुनि कर । प्रार्थित मज ठेवि न कुजनीं ॥ शांता ॥३॥
कृश्ण तनय वय जाय परम सुख । व्हाया ध्यात जयां दिनरजनि ॥ शांता ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP