श्रीमन्नागेशाचें पद

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद २७ वें.
नागेश उमानाथा । जय सदय नागनाथा । मज तारिं प्रभो आतां । शिवशंभोशंकर बहुसुख नाम तुझें गातां ॥ धृ० ॥
भव ताप दु:ख नुरवी, निज लाभ हेतु पुरवी । चंचल हें मानस चिन्मय भक्तिसुखीं मुरवीं ॥ नागेश० ॥१॥
करिं सकल विन्घनाशा, हरिं विषय सेवनाशा । मी माझें गृह धन सुत या तोडिं मोहपाशा ॥ नागेस० ॥२॥
तव कंठिं रुंडमाळा, पाहतां कंप काळा । चिद्नंगा शोभतसे मस्तकिं त्रिजगपाळा ॥ नागेश० ॥३॥
नर जन्म मला दिधला, परि ओळखिलें न तुला । नाहिं तुझ्या प्रेमरसें हा अंतरंग भिजला ॥ नागेश० ॥४॥
साष्टांग नमन चरणीं, अघटीत तुझी करणी । अनुभव हा कृष्णसुताला पावसि तूं स्मरणीं ॥ नागेश० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP