मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग १४४ अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ संतसंगाच्या महिमेचा अभंग - अभंग १४४ श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर संतसंगाच्या महिमेचा अभंग Translation - भाषांतर १४४. धन्य धन्य धन्य सज्जनाचा संग । ज्ञान भक्तिरंग रंगावया ॥१॥रंगावया मन चैतन्यस्वरूपीं । नाहीं दुजा ओपी ज्ञान ऐसें ॥२॥ज्ञान ऐसें जागें जयाचे ह्रदयीं । नित्य त्याचे पायीं ठेवूं माथा ॥३॥ठेवूं माथा अहंकार निरसोनी । सेवा संपादूनी राहूं तेथें ॥४॥राहूं तेथें मन सर्वदा विश्रांती । संसाराची खंती आठवेना ॥५॥आठवेना एका आपणांवांचोनी । जनीं मनीं वनीं घनदाट ॥६॥घनदाट सुखस्वरूप आपुलें । अंतरीं धरिलें आत्मभावें ॥७॥आत्मभावें निज दर्शनाचा लाभ । दिधला स्वयंभ गुरुराया ॥८॥गुरुराया स्वामी ! समर्था ! वैष्णवा !। द्यावी निज सेवा कृष्णदासा ॥९॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP