मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग ५१ ते ६० अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ अभंग ५१ ते ६० श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर अभंग ५१ ते ६० Translation - भाषांतर ५१जरि तूं न येसी राघवा । मी न ठेवीं माझ्या जीवा ॥१॥जाणु-नि निश्चय तूं हा माझा । त्वरित येरे श्री रघुराया ॥२॥माझी आवडी आपणावरि भारीं । आपुला धीर मज संसारीं ॥३॥येरे धांवत मेघश्यामा । प्रभु संतमनो विश्रामा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥ येरे सोडुनियां हट आतां ॥५॥५२कृपा समुद्रा राम राया । नाशिवंत हे तों काया ॥१॥आतां लाऊं नको ऊशीर । देउनि दर्शन करिं मन स्थीर ॥२॥आपणा विषयीं तळमळतों मी । चकोरासी इच्छा सोमीं ॥३॥तैसें तुजवरि माझें मन । विषय वाटती वमन ॥४॥अंतर्साक्षी तूं रघुनाथा । विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥५३आपणा पाहेन आवडी । ऐसें आठवतें घडि घडि ॥१॥कधीं भेटसी दातारा । आत्म स्वरुपीं द्याया थारा ॥२॥येरे लगबग ऊतावेळीं । राम राया तूं वनमाळी ॥३॥आत्म विषईंची खंती । उरों नेदि हेचि विनंती ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । वेगें दर्शन दे मज आतां ॥५॥५४येथें अखंडात्म दर्शन द्वारें । स्फुरविं आनंद जगिं सर्व प्रकारें ॥१॥नवविधा भक्ति घडविं जनाला । आत्म प्रेमें लावीं निजभजनाला ॥२॥रामा हेचि माझी चरणिं विनंति । कृपेनें संभाळीं आदि अंतीं ॥३॥करा-वया आमुचा वंशोद्धार । रामा आला तूं झाला आनंद फार ॥४॥प्रभु विष्णु कृष्ण जगन्नाथा । नित्य आयकों हे काळ आत्म पथा ॥५॥५५एक विनवणि माझी परिसावी । राजि व नयना लक्षिं असावी ॥१॥आत्मपदीं मज द्यावा रहिवास । स्वरुप विस्मृति न पाडिं या जिवास ॥२॥सच्चिदानंद स्वरुपा राम राया । ढळों नेंदी जैं पडेल माझि काया ॥३॥अलक्ष लक्षविं तुज स्वप्रकाशा । स्वानंद घोंटविं नेदुनि अवकाशा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथापरमानंदा । सच्चित्सुख आधार तूं मज मतिमंदा ॥५॥५६. ज्याचें नामचि तारक लोकां । त्या तुज पाहिला जानकि नायका ॥१॥झालें डोळ्यांचें पारणें । मनोवृत्तीचें थारणें ॥२॥आत्म दर्शनाचा योग । अधिकाधिक वाढवि सुखभोग ॥३॥आत्म महिमा वर्णूं किति । भक्त कनवाळू सितापती ॥४॥विष्णू कृष्ण जगन्नाथा । आठवण तुझी दे रे येतां जातां ॥५॥५७. मना ऐसा महाराज आहे कोठें । आत्म भक्तां विषयीं प्रेम ज्यासि मोठें ॥१॥धर्म संस्थापना दुष्टांचा संहार । स्वभक्तरक्षाया धरि नाना अवतार ॥२॥उपमन्युसी दीधला क्षीरनिधी । ध्रुव बैसविला जेणें अढळ पडीं ॥३॥सुदामासी दिधली सोन्याची नगरी । प्रर्हादास्तव झाला स्तंभीं नहरहरी ॥४॥सदय राम विष्णु कृष्ण जगन्नाथ । सच्चिदानंद स्फुरे त्या लक्षी आंत ॥५॥५८. सत्य सत्य श्रीराम दयासिंधु । स्वभक्तांतें न सोडी दीन बंधु ॥१॥प्रत्यय झाला स्वानुभवें बहुतांसी । कळवि सच्चित्सुखमय आपणासी ॥२॥नाहीं ऐसा कृपाळू जगामाजी । स्वयें धांवे जो आपुल्या भक्तकाजीं ॥३॥त्यजितां विषयांचें चिंतन । आत्म दर्शन दे रामा आनंद घन ॥४॥राम विष्णु कृष्ण जगन्नाथ । व्यापक एक अनंत कोटि ब्रम्हांडांत ॥५॥५९. तुज ऐसा देव न दुजा । ऐसा निश्चय झाला माझा ॥१॥चतुर्मुखा नलगे पार । स्वगुण वर्णितां अपार ॥२॥ तो तूं भेटला रामराजा । संगें जाच्या जानकि भाजा ॥३॥आत्म दर्शन आनंद । स्फुरतो जो हरि भवबंध ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । तूंचि मोक्ष सुखचा दाता ॥५॥६०. पिताराम तूं माता सीता । मज संरक्षिसि भवभय भीता ॥१॥न ढळवीं हा माझा धीर । प्रतापी तूं श्री रघुवीर ॥२॥तुज भक्तांची आवडी । हरिसी जन्म मरण कावडी ॥३॥आरुंत संगें आत्म लाभा ॥ दिधल सच्चिदानंदा स्वयंभा ॥४॥विष्णु कृष्ण लगन्नाथा । तूंचि मोक्ष सुखाचा दाता ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP