मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग ६१ ते ७० अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ अभंग ६१ ते ७० श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर अभंग ६१ ते ७० Translation - भाषांतर ६१. सर्वार्थि मज एक आपण विसावा । सच्चित्सुख आत्म वियोग नसावा ॥१॥आत्म पदीं हेचि विनंति परिसावी । आत्म प्रेमें आत्म भक्ति मज असावी ॥२॥मना लागों तूझें सगुण मुर्ति ध्यान । आत्म विवरण ऐको माझे कान ॥३॥डोळां पाहेन सुंदर अवतार । मंद हसित मुख सुखकर फार ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा निज भेटी । जन्मजन्मांतरिचीं नुरविं दु:खें कोटी ॥५॥६२. अनंत जन्मांतरिंचें पुण्य उदया आलें । आपुलें दर्शन मज झालें ॥१॥सारी वृत्तीची तळमळ माझी गेली । ह्रदयिं निजात्म दर्शन स्फूर्ति उदेली ॥२॥अवघा आनंद आनंद । आपण आनंद आनंद सुखकंद ॥३॥ऐसा आत्म लाभ मातें । तुज विसरूं कसा रामातें ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । तूंचि आठवसि येतां जातां ॥५॥६३. तुज पहातां श्री रघुवीरा । चित्त वृत्ती झाल्या स्थिरा ॥१॥नाही या परतें साधन । कळला आपण आनंदघन ॥२॥माझें जीवींचें जीवन । नाहीं आन तुजवीण ॥३॥हेतू पूर्ण केला माझा । आत्म दर्शनें रघुराजा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । भेटला तूं सिताकांता ॥५॥६४. आणिक देव येति जाती । आपण ह्रदयस्थ सांगाती ॥१॥तुज पाहतां सन्मुख । वृत्ती होती अंतर्मुख ॥२॥नुरे संसारींचें दु:ख । अधिकाधिक वाढे सुख ॥३॥ऐसें कळलें माज्या मना । तुज न सोडी जगजीवना ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुज नेदी जाऊं आतां ॥५॥६५. कळे त्या निज दर्शन सुख । वृत्ति ज्याची अंतर्मुख ॥१॥कळलें आपण एकचि सार । मिथ्यामय हा द्दश्य पसारा ॥२॥तुज कथिला प्रत्यय माझा । आनंदघना राघव राजा ॥३॥आत्म भजनाची आवडी । मोठी देह बुद्धी खोडी ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । स्वसुखानुभवचि घोंटिन आतां ॥५॥६६. कोणि काइ म्हणो आतां । तुज मी न सोडीं सर्वथा ॥१॥लोकापाशीं माझें काय । सुखकर मज आत्म ठाय ॥२॥नाहीं आणिकांची गोडी । अखंड आपुली मज आवडी ॥३॥तुज पाहुनि प्रेमा दाटे । विश्व आपण मुखमय वाटे ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । मुखें वर्णिन निज गुण गाथा ॥५॥६७. धन्य माझीं मातापिता । निज भेटीनें सिताकांता ॥१॥धन्य माझी हे नर काया । आपण भेटला रामराया ॥२॥धन्य माझे दोनीकर । तुज करिती नमस्कार ॥३॥धन्य धन्य माझे डोळे । तुज निरखिति वेळों वेळे ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । मुखें वर्णिन निजगुणगाथा ॥५॥६८. ऐसा दर्शन सुख सोहळा । कैसा मिळता मज घननीळा ॥१॥तुवां केला ऊपकार । दिला मनुष्याचा आकार ॥२॥आत्मदर्शन साक्षात्कार । केला तुज माझा नमस्कार ॥३॥गुण गाईन वारंवार । पुरवीं मज हेतू हा फार ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । उदया आला तूं ह्रदयस्था ॥५॥६९. तुज सम ना त्रिजगीं कोणी । रामा पाहिलें धुंडोनी ॥१॥ब्रम्होंद्रादी निज किंकर । गातो नाम तुझें शंकर ॥२॥तो तूं सांपडला मज । आपण सुखरूप सहज ॥३॥तुज ऐकत होतों कानीं । आजि पाहिला नयनीं ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । कृपा सिंधु तूं तत्वता ॥५॥७०. माझी विनवणि तुम्हां संतां । मज भेटवा सीताकांता ॥१॥मजविषयींच्या गोष्टी चार । सांगुनि पाठवा करा उपकार ॥२॥घालुनी तुमची थोर भीड । त्यासी येउं न द्या माझी तीड ॥३॥युक्ति प्रयुक्तिनें पाठवावा । दास तुमचा मी आठवावा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । आवडती भक्तकथा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP