मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग ८१ ते ९० अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ अभंग ८१ ते ९० श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर अभंग ८१ ते ९० Translation - भाषांतर ८१. वंश आपुला धन्य केला । आपण प्रगटुनियां भुमिकेला ॥१॥नित्य आमुच्या हातें सेवा करूनि घेईं । रामराजा अखंड आत्म भक्ति देईं ॥२॥नेणों वडिलांची किति पुण्याई । तेणें आळसि तूं प्रभूठाईं ॥३॥येथें राहुनियां स्थीर रामराजा । रमवीं यावच्चंद्र सूर्य सत्समाजा ॥४॥विष्णू कृष्ण जगन्नाथा सच्चित्सूखा । विषय वृत्ती माझ्या करिं अंतर्मुखा ॥५॥८२. झालें नयनाचें सार्थक । भेटला तूं जानकि नायक ॥१॥तुज पाहुनि डोळेभरी । मुखें बोलेन रामकृष्ण हरी ॥२॥आपणाची मज आवडी । घोंटिन निज सुख घडि घडी ॥३॥सुंदर मदनाहुनि तूं रामा । कुंदरदना मंगळ धामा ॥४॥विष्णू कृष्ण जगन्नाथा । मज सोडुं नको समर्था ॥५॥८३. हातें वाजवूनि टाळी । तुझी गाइन नामावळी ॥१॥चरणीं नाचेन सन्मुख । तुझें पाहुनि मंदहास्य मुख ॥२॥कळला सच्चिदानंद तूं आपण । त्या तुज माझें लोटांगण ॥३॥निरखुनि आपणातें निजडोळां । घोटिन आनंद वेळोवेळां ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । भक्तां आवडति तुझी गाथा ॥५॥८४. तुज सोडवेना रामा । सच्चिदानंदा सुख धामा ॥१॥आत्मपद लंपट दासासी । तूं मज सोडुनि कैसा जाशी ॥२॥तुझें वर्म आहे मजपाशीं । द्दश्य त्यजुनि धरिन आपणासी ॥३॥मग तूं सहजचि सांपडला । प्रेमपाशें आवडला ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । मी न सोडीं तुज भगवंता ॥५॥८५. तुज करुणा माझी आली । म्हणउनि मज आत्म भेटी झाली ॥१॥विसरे नाहीं उपकार । दे निज आत्म पदीं मज थार ॥२॥रामा आनंदाच्याकंदा । आपण भेटला मज मति मंदा ॥३॥सदय ह्र्दय तुझें कळविलें । माझें दु:ख दरिद्र पळविलें ॥४॥विष्णू कृष्ण जगन्नाथा । शाश्चत आत्म लाभ हा तत्वता ॥५॥८६. आला जन्मा तोचि म्हणावा । ज्यासि तुजविण प्रपंच न ठावा ॥१॥भिकारी हो भाग्यवंत । आवडसि ज्यासि तूंचि अनंत ॥२॥थोटा पंगु अंध जरी झाला । प्रेमें आवडसि तूंचि एक ज्याला ॥३॥ज्यासी अखंड आत्म भेटी । आत्म प्रेम ज्याचे पोटीं ॥४॥विष्णू कृष्ण जगन्नाथा । साधिल जो नवविध भक्ति पथा ॥५॥८७. आत्म भक्तां सम माग्यवंत । नाहीं नाहीं कोणी त्रिजगांत ॥१॥काळें करूनि सेर । याचें अधिकाधिक चढुनी ऊरे ॥३॥झाला पूर्ण निश्चय ऐसा माझा । आपण आनंदघन रामराजा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । सत्य सत्य हें बोलणें नोहे वृथा ॥५॥८८. भला जन्म हा सुंदर मानवाचा । लाभ झाला तुझा राघवाचा ॥१॥श्वान सूकर लक्ष चोर्यांशीं योनी । फळ काय होतें त्यांत उपजोनी ॥२॥मजमनुष्य केला रे त्वां रामा । आपण भेटला अखंड सुखधामा ॥३॥हाचि आठवतो उपकार । आत्म लीलेचा चमत्कार ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । हरीं लया ही प्रपंच भय व्यथा ॥५॥८९. दयाघना तूं रामराजा । त्वांचि धरिला अभिमान माझा ॥१॥मज काय कळे पामरा । आत्म आठवण प्रिय अंतरा ॥२॥तेणें आपण होउनि प्रसन्न । केलें माझें अखंड समाधान ॥३॥आतां तुज मी न सोडीं । मज लागली आपुली गोडी ॥४॥विष्ण कृष्णु जगन्नाथा । हरिल्या त्वां प्रपंच व्यथा ॥५॥९०. माझे ह्रदयींचें जें सार । तें तुज कळवीलें साचार ॥१॥आपण सांपडला जो स्वता । त्या तुज न सोडीं सर्वथा ॥२॥मज सोडुं नकोरे रामा । आदिअंतिं आपण एक सुखधामा ॥३॥तूं मज धीरांचारे धीर । एक आपण श्रीरघुवीर ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । न करिं आत्म वियोग व्यथा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP