मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग २१ ते ३० अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ अभंग २१ ते ३० श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर अभंग २१ ते ३० Translation - भाषांतर २१मागेन मी धन तुजपासीं । या भयें तूं कां नयेसी ॥१॥माझे काय तें तूं धन । अखंड तुजवरि माझें मन ॥२॥तुजसाठीम दाही दिशा । हुडकित फिरलों जानकीश ॥३॥तरि मज कोठें तूं न दिससी । दृष्टी आड लपुनी अससी ॥४॥हें तुज शोभे काय सांग । धरणें आणिकाची म्यां पांग ॥५॥करुनी लगबग ये रे आतां । विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥६॥२२तुझ्या भेटीची मज आशा । कैसा तोडिसि प्रेम पाशा ॥१॥सांग सांग जानकीशा । रामराया श्री जगदीशा ॥२॥तुज शोधूं तरि मी कोठें । दुष्ट प्रारब्ध माझें खोटें ॥३॥ह्मणुनी निष्टुर तूं झालासी । पापी ह्मणुनि काय भ्यालासी ॥४॥कोणी कथिली माझी चहाडी । कीं तुज येतां कोणी ओढुनि पाठी काढी ॥५॥येतां कोणि केली तुज आज आड काठी । अथवा अपशकुनें फिरला पाठीं ॥६॥माझ्या जाउनि पातक मोठा । तुझ्या आडविल्या का त्याणीं वाटा ॥७॥तरि मी जीव न ठेविन माझा । जरि तूम न भेटसी श्रीराम राजा ॥८॥विष्णु कृष्ण जगन्नाथा आळ तुजवरी हा सर्वथा ॥९॥२३ऐसी येते तुज आशंका । यासी भेटतां सांपडेन कलंका ॥१॥सत्य तें तूं वद राघवा । सर्वस्वी तूं मज आघवा ॥२॥तरि हा दुष्ट दुराचारी । जरि हा नित्य माझ्या नामें हाका मारी ॥३॥भक्तवत्सल पतित पावन नामा । निज नामार्थ सोडिसि काय रामा ॥४॥काय लोकांची तुज भीती । भेटी द्याया सीतापती ॥५॥आत्मनामाची प्रख्याती । जेथें तेथें भक्त गाती ॥६॥तरि तूं भीतोसी तें काय । मज दाखवाया पाय ॥७॥करितिल काय तुझे ते लोक । ज्यांसी नाहीं अर्थ विवेक ॥८॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । सोड मूर्खांच्या त्या कथा ॥९॥२४मज कंठवेना रामा । तुजविण एक घडि सुखधामा ॥१॥ह्मणुनी तुज काकुळती । दर्शन देरे सितापती ॥२॥जरि तूं राहसी ऊगला । समज माझा जीव गेला ॥३॥कळलें मी माझें हें सारें । मिथ्या चंचल जैसें वारें ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । मज लावीं आत्म पथा ॥५॥२५तुझ्या भेटीचा वियोग । न साहे परी कर्मभोग ॥१॥माझा म्हणउनि तूं न येसी । मज कधिं रे दर्शन देसी ॥२॥आतां न लावीं ऊशीरा । धांवत येरे श्री रघुवीरा ॥३॥जल जीवन जैसें मीना । तसा तूं मज जगजीवना ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । नुरवीं जन्म मरण व्यथा ॥५॥२६मज तूझीच आवडी । आठवसी घडी घडी ॥१॥तरि तुज शोधूं कोण्याठाईं । सांपडसी कोण उपाईं ॥२॥तुज भेटायाची कींव । येवुनि तळमळ तो हा जीव ॥३॥ये रे ये रे सितारामा । जिवलगा मंगळ-धामा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुज मी कळविलि माझी गाथा ॥५॥२७राम दयेचा सागर । भक्त गाती बडीवार ॥१॥तो तूं लटिका करिसी काई । मज तळमळविसि या ठाईं ॥२॥ये रे ये रे दयाघना । प्रभो जानकी जीवना ॥३॥मज धीर तुझा गंभीर । देवुनि दर्शन करीं मन स्थिर ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । आहे लक्षुनि आत्मपथा ॥५॥२८आत्म भेटी मन भूकेलें । तरि त्वां निष्टुर मन कां केलें ॥१॥राम भक्तांचा अभिमानी । ह्मणती तुज मोक्ष दानी ॥२॥तो तूम सोडिसिकां रे मज । रामा अंतरीं समज ॥३॥धरुनियां अभिमान माझा । येरे धांवत राम राजा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । करीं पूर्ण मनोरथा ॥५॥२९झालासि निष्टुर कांरे ऐसा । धरिला तुझाचि भरंवसा ॥१॥दाउनि मायेचा हा खेळ । किती लविसि तूं वेळ ॥२॥येरे धांवुनि झडकरि रामा पुरवीं माझ्या इच्छित कामा ॥३॥तुझी गाइन ब्रीदावली । रामा रामा हे वनमाळी ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । दूर करीं मनोव्यथा ॥५॥३०कोणतीहि न धरि तूं शंका । भेटि द्याया मज या रंका ॥१॥कांहि मागेन मी तुज पाशीं । या भयें तूं परतुनि जाशी ॥२॥तरि मज कांहि नको तुजविण । मन न तुझें कठीण ॥३॥दावीं एकदां चरण । अनन्यभावें तुज शरण ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । मज उद्धरि दीन अनाथा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP