मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|अभंग संग्रह| अभंग ११ ते २० अभंग संग्रह अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १३९ अभंग १४० ते १४३ अभंग १४४ अभंग १४५ अभंग ११ ते २० श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : abhangbandkarkavyaअभंगकाव्यबांदकर अभंग ११ ते २० Translation - भाषांतर ११रामा तुज विण कोणा । माझि येईल करुणा ॥१॥वत्सालागीं जैशी गाई । सर्वार्थीं तूं माझी आई ॥२॥जरि तूं टांकिसी वनमाळी । तरि मज कोण रे संभाळी ॥३॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । येरे वेळ न लावीं आतां ॥४॥१२ऐसें ऐकिलेम म्या पाठीं । कळवळसी तूं भक्तांसाठीं ॥१॥तरि मी आहे कीं दांभीक । लपुनि पाहसी कंवतुक ॥२॥तुझें दयाळुत्व मोठें । परि मजकरितां झालें खोटें ॥३॥ऐसें नकरीं दयाळा । येवुनि भेटें या मज बाळा ॥४॥लोक पिटीतील टाळी । जाईल तुझी ब्रीदावळी ॥५॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । नको सोडूं मज अनाथा ॥६॥१३तुज पाहुनियां निज डोळां । सुख घोटिंत वेळो वेळां ॥१॥मज लागली हे आशा । कां न पुरविशि जगदीशा ॥२॥चराचरीं तूं उघडा । परि मज दिसेना दगडा ॥३॥यासि आतां करूं मी काई । जळों वय हें फुकट जाई ॥४॥रामा सारुनि सर्व अपाया । दाखविं आपुल्या दिव्य पाया ॥५॥ विष्णु कृष्ण जगन्नाथा रे । तुजविण चित्त न माझें थोर ॥६॥१४ऐकुनि शब्द न येसी माझे । कां रे चित्त तुझें लाजे ॥१॥आहे दुष्ट अवगुणी । जाउनि भेटावें त्या कोणी ॥२॥ऐसें जरी तूज वाटे । तरि हा लविन जीव वाटे ॥३॥सत्य सांगतों राघवा । जरि तूं नयेसी येधवां ॥४॥तरि मी न ठेवीं हा जीव । त्वरित दावीं पदराजीव ॥५॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । सोसवेना वियोग व्यथा ॥६॥१५ह्मणसी आहे तूं अतिपापी । चित्त माझें त्या संतापीं ॥१॥सकल पातकांचें कोड । तुझें न पाहें मी तोंड ॥२॥ऐसा जरि तूं रागा-वसी । जगीं अपकीर्ती पावसी ॥३॥पतीत पावन तूज ह्मणती । या नामांची गति कोणती ॥४॥मी पतीत तूं पावन । राम जानकी जीवन ॥५॥रोगां नाशी औषध जैसें । पाप्या पावन नाम तैसें ॥६॥पतीत पावना श्रीरामा । साच करीं आपुल्या नामा ॥७॥हाचि माझ्या ह्लदयीं धीर । तारिसि मज तूं श्री रघुवीर ॥८॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । भेटुनि पुरवीं मनोरथा ॥९॥१६धरूं कोणाचा भरवंसा । तूंचि मज जानकीशा ॥१॥बहुत येती आणि जाती । तूं मज जन्माचा सांगाती ॥२॥मज आपुली आवडी । आठवतोसी घडी घडी ॥३॥क्षणभंगूर हे काया । भेट देरे रामराया ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । गातो आत्म गूण गाथा ॥५॥१७कां रे न येसी अजूनी । दिवस आहे मी मोजूनी ॥१॥गुप्त राहोनी एकांता । मौज पाहसि कीं सीताकांता ॥२॥चोज वाटतें हें मज । तळमळविसी असुनी समज ॥३॥तरि तूं ऐसें करिसी काय । भक्त वत्सल तूं रघुराय ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । हरी माझी अतर्व्यथा ॥५॥१८म्हणसि ये ना मी तुजपासीं । नाहीं गणती तुझ्या पापांसी ॥१॥दयाळें त्वां मायबापें । माझीं लक्षावीं काय पापें ॥२॥अनंत कोटी अप-राध माझे । न लक्षावे त्वां रघुराजेम ॥३॥माझा जिवींच्या जीवना । ये रे धांवुनि दयाघना ॥४॥दावी आत्म भक्ती पथा । विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥१९करीं इतुका ऊपकार । नुरवीं देह अहंकार ॥१॥सेवितां यां विषयां पांचां । पूर्ण हेतू न होय मनाचा ॥२॥कळलें कळलें हें मज देवा । तूंचि पूर्ण सुखाचा ठेवा ॥३॥ते मज पदवी उघडुनी दावीं । विषयासक्तां जे न ठावी ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । गाइन निशिदिनिं आत्मगाथा ॥५॥२०कृपा केल्या त्वां रघुनाथें । लाथा हाणिन संसारातें ॥१॥ऐसा ह्लदयीं मज आवांका । काय विषय सुखाचा लेखा ॥२॥तरि हें आहे तुजपाशीं । भेट देणें गरीबासी ॥३॥आतां न लावीं ऊशीरा । देरे दर्शन श्री रघुवीरा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । आवडती आपुल्या कथा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 08, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP