विद्यागणपतिरहस्यम् - अध्याय ५ वा

प्रस्तुत पोथी म्हणजे गणेशप्राप्तीची इच्छा करणार्‍यांना अत्यंत आवश्यक असें पूजाविधान.


शंकर सांगूं लागले :
आतां विद्यागणेशयंत्र कथन करतों तें ब्रह्म-देवा तूं ऐक. प्रथम बिन्दु, त्याभोंवतीं त्रिकोण, षट्‍कोन, अष्टपत्र क्रमानें काढावेत. बिन्दूमध्यें गणेश, त्रिकोणांत वेदबीज, षट्‍कोनांत मंत्राक्षरें, अष्टकोनांत स्वाहा, त्याच्या वरील भागांत ज्याला साध्य करावयाचें त्याचें नांव याप्रमाणें लिहावींत. सर्व मंत्राक्षरें कामबीजासह लिहावींत. अष्टपत्र आणि अष्टकोन यांत सतारक मंत्र लिहावा. असें सर्व लिहून त्याची यथाविधि प्राणप्रतिष्ठा-स्थापना करावी. तांबडया फुलांनीं पूजा करून सात रात्रीं त्या यंत्राचें पूजन करावें. त्या वेळीं. दुधाची खीर, अनारसे, केळीं, मोदक यांचा नैवेद्य दाखवून तांबूल द्यावा आणि ५००० जप करावा. मग तें सिद्ध झालेलें यंत्र उजव्या हातांत धारण करावें. राजा, अमात्य, सेवक, स्त्रीपुरुष नाना प्रकारचे पशुपक्षी सात रात्रींच्या आंत एखाद्या नोकराप्रमाणें वश होतात. किंवा कुंकूमिश्रित चंदनानें यंत्र लिहून ( चंद-नांत कापूर घालून ) त्यावर साध्याचें नांव घालून प्राणप्रतिष्ठा स्थापना करावी,
त्यावर गणाधीशाची पूजा करून ८००० जप करून तें चंदन आपल्या शरीराला लावावें. अशा माणसाच्या केवल दर्श-नानें, वासानें स्त्रीपुरुष त्याच्यासाठीं प्राणहि देतील.
मदनासक्त स्त्रिया परतंत्र होऊन वश होतील, यांत शंका नाहीं. किंवा साळीच्या पिठांत तूप, साखर घालून आपल्या साध्यरूपाची आकृति तयार करून मंदाग्रीवर भाजून त्यावर यंत्र काढावें आणि त्यामध्यें साध्याचें नांव लिहावें. ८००० जप करून स्वत: त्याचें भक्षण करावें. तो ( साध्य ) पुरुष, स्त्री अगर पशु मरेपर्यंत वश होऊन राहील.
सुवर्णावर किंवा तांब्यावर यंत्र काढून त्याची पूजा करून तें जो कोणी धारण करील त्याला त्रैलोक्य वश होईल.
भक्ष्य, भोज्य पदार्थावर यंत्र सिद्ध करून जो १०८ जप करून त्याचें भक्षण करील त्याला सर्व वश होईल. अभिमंत्रण केलेलें साध्ययुक्त यंत्र घेऊन जो सभेमध्यें जाईल
तो सारी सभा जिंकील ज्याचें तो स्मरण करील तें सर्व त्याला आठवेल. आकर्षण करणारीं विचित्र कर्मै अशीं आहेत. पूर्वींप्रमाणें यंत्र काढून त्यावर साध्याचें नांव लिहून
सर्व बीजाक्षरें मायाबीजांत लिहावींत. मंत्राच्या शेवटीं “ साध्यमाकर्षय” असें लिहावें. एक प्रप्ताह यथाविधि जप करावा. कार्यसिद्धि होते.
थोडे चांगले तांदूळ घेऊन, त्याच्या निम्मे मृग घ्यावे. चार चमचे गूळ, त्या मानानें खोबरें घ्यावें. मूठभर मिरची, त्याच्या निम्में मीठ, त्याच्या निम्मे जिरें घावें.  ते थोडया गाईच्या तुपांत घालावें. आणि तें सर्व गाईच्या दुधानें एकत्र करून मंदाग्रीवर शिजवावें.  मग तें जें सिद्धान्न तयार होईल, तें विघ्नेशाला पूजापूर्वक समर्पण करून त्यापासून सर्व कार्ये सिद्ध करून घ्यावींत. साध्य वस्तु आपणकडे त्वरित येईल. भूर्जपत्रावर हें यंत्र लिहून काखेंत ठेवावें किंवा एरंडाच्या दंडांत ठेवावें. दिव्यावर धरून साध्याचें नांव घेऊन तापवावें, किंवा ज्याला साध्य करावयाचें त्याच्या डाव्या पायाची धूळ घेऊन त्यावर यंत्र लिहून १०८ मंत्र जपावा. तो विघ्नेश्वराला अर्पण करून मंत्र-यंत्रविधि करावा.
त्यामुळें साध्य वस्तु प्राप्त होईल.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP