विद्यागणपतिरहस्यम् - अध्याय ४ था
प्रस्तुत पोथी म्हणजे गणेशप्राप्तीची इच्छा करणार्यांना अत्यंत आवश्यक असें पूजाविधान.
शंकरांनीं सांगितलें :
ब्रह्मदेवा, मी आतां पंचमावरण सांगतों. अष्टपत्राबाहेर असितांगभैरवाची पूजा करावी. जवळच ब्राह्मी इत्यादि सप्तमातृकांची पूजा करावी.
नंतर षोडशपत्रावर षष्ठावरण पूजन करावें. त्या वेळीं म्हणावयाचा मंत्र : “ ॐ श्रीं र्हीं गं सिद्धविद्यागणेशश्रीपादुकां पूजयामि । ”
सप्तमावरणासाठीं सोळा शक्तींचें पूजन करावें. तसेंच अणिमादि सिद्धींचें पूजन करून मूल-मंत्रानें चार वेळां गणेशपूजन करून त्याच्या अष्टमावरणासाठीं मूलमंत्रानें गणेशार्चन करावें. विघ्नेश्र्वरासहित रत्नकुंभाची पूजा करून आयुधांच्या बाहेरच्या भागावर नवमावरणामध्यें इन्द्रादि लोकपालांची पूजा करावी. विघ्नेश्वराच्या ईशान्य कोपर्यांत भैरवपूजन करून नाराचमुद्रा दाखवून बलिमंत्राचा उच्चार करावा.
“ ॐ नमो भगवते कुरु कुरु बटुकाय देवीपुत्राय विद्यागणेश-परिपदे इमं बलिं गृहाण गृहाण स्वाहा गणेश चतुर्दिक्षु भूचर-खेचर-यक्ष-राक्षसगणेभ्य: इमां पूजां बलि गृह्लन्तु साफल्यं कुर्वन्तु हुं फट् स्वाहा । ”
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP