विद्यागणपतिरहस्यम् - अध्याय १ ला

प्रस्तुत पोथी म्हणजे गणेशप्राप्तीची इच्छा करणार्‍यांना अत्यंत आवश्यक असें पूजाविधान.


गिरिराज हिमालयाच्या सोनेरी शिखरावर, ऋषिमुनींच्या सान्निध्यांत कल्पवृक्षांनीं वेढलेल्या रत्नजडित खांबांनीं युक्त असलेल्या रत्नजडित खांबांनीं युक्त असलेल्या रत्नमंडपांत रत्नमय सिंहासनावर पार्वतीसह बसलेल्या श्रीशंकराचें दर्शन घेण्यासाठीं स्वत: ब्रह्मदेव आले आणि हात जोडून स्तुति करूं लागले.

“ हे शंकरा, सच्चिदान्मदस्वरूप, वेदान्तवेद्य अशा तुला माझा नमस्कार असो.
ब्रह्माविष्ण्वादि-स्वरूप, सर्वभूतांच्या अंतर्यामीं असलेल्या तुला माझा पुन्हां पुन्हां नमस्कार असो. ”


या स्तुतीनें संतुष्ट झालेले भगवान् शंकर म्हणाले,
“ ब्रह्मदेवा ! तुझें स्वागत असो.
तुझी सृष्टि निर्माण करण्याची कामगिरी व्यवस्थित चालू आहे ना?
मी तुझ्या स्तुतीनें संतुष्ट झालों आहें.
तुझ्या येण्याचें कारण काय ? ”

तेव्हां ब्रह्मदेव म्हणाले,
“ हे देवेशा, तुला अज्ञात असें कांहीं नाहीं;  आणि दुसरें असें कीं, तुझ्या चरणकमलाच्या दर्शनाशिवाय माझ्या-सारख्याला दुसरें कोणतें मोठें फल असणार? तरीहि माझ्या मनांत एक गोष्ट जाणून घ्यावयाची आहे. ती म्हणजे सर्व देवदेवतांनी उपास्य म्हणून मानलेला श्रीगणेश आणि त्याची विश्व-स्वरूपी महाविद्या, जिनें मायेनें हें चराचर विश्व निर्माण केलें आहे, जिला परब्रह्मस्वरूप म्हणतात, त्या विद्यासहित विघ्नेश्वराला जाणण्याची माझी इच्छा आहे.  तरी त्यासाठीं यंत्र, तंत्र, पुरश्चर-णादि क्रिया कृपा करून मला सांगा.”

तेव्हां श्रीशंकर म्हणाले, “ ब्रह्मदेवा, ऐक, सर्व ऐश्वर्य देणार्‍या, सर्व लोकांना विमोहित करणार्‍या, चतुर्विध पुरुषार्थांचें साधन असलेल्या आणि  सर्व सिद्धि प्रदान  करणार्‍या गणेशाचें यथायोग्य स्वरूप तूं ऐक. ” असें म्हणून ते सांगूं लागले :

श्रीविद्यागणेशस्य दक्षिणामूर्ति: ऋषि: । देवी गायत्री छंद: ।

विद्यागणेश्वर: देव: ।

गं बीजम् ।

र्‍हीं शक्ति: ।

पंचबीजात्मक: र्‍हामिति षडंग: ।
तथा च ध्यानम्  - “ करीन्द्रवदनं वन्दे त्रिनेत्रं चन्द्रशेखरम् ॥
अधस्तात् वनिताकारं सिन्दूरारुणविग्रहम् ॥१॥
उत्तुंगस्तनभारोद्य-द्रत्नभूषणभूषितम् ॥
क्कणत्किंकिणीकाकांची-मणिनपुरभूषितम् ॥२॥
बीजापूरं गदां चापं शूलं चक्रं सरोरुहम् ॥
पाशोत्पले च व्रीह्यग्रं स्वदन्तं रत्नकुंभकम् ॥३॥
बिभ्रत्सकंकणैर्हस्तै-रुभाभ्यां हेमशृंखलम् ॥
बिभ्रंत विद्यागणपं ध्यायेत्सर्वार्थसिद्धये ॥४॥ ”
इति ध्यानम् । हें ध्यान दररोज प्रात:कालीं १६ वेळां करावें.
त्यानें सर्व इच्छा पूर्ण होऊन विघ्नेश्वर प्रसन्न होतो.
आतां मी तुला विघ्नराजाचा मंत्रोद्धार कथन करतों:

“प्रणवं पंचबीजाढयं विद्याप्रथमखण्डकम् ॥
गणपतिं चतुर्थ्यन्तं द्बितीयं खंडमुच्यते ॥१॥
वरद्बयदमुच्चार्य तृतीयं खंडमेव च ॥
पश्चात् सर्वजनं मे‍ऽद्य वशमानय संयुतम् ॥२॥
स्वाहे-त्युक्तो गणेशस्य मन्त्रोऽ सर्वसिद्धिद: ॥
धन-धान्यप्रद: सद्य: सर्वलोकवशंकर: ॥३॥
आयुष्कर: प्रजावृद्धिकरो व्याधिविनाशकृत्‍ ॥ ”

हा मंत्र सदगुरूच्या मुखांतून ग्रहण करावा.
सद्‍गुणी, गणेशभक्त, मंत्रवेत्ता, दयाळू, शांत आणि परंपरेनें चालत आलेल्या क्तिया करणार्‍या सद्‍गुरूकडून ‘ विद्यागणपति मंत्र ’ घ्यावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP