मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|आरती| आरती अकरावी आरती आरती पहिली आरती दुसरी आरती तिसरी आरती चवथी आरती पांचवी आरती सहावी आरती सातवी आरती आठवी आरती नववी आरती दहावी आरती अकरावी आरती महालक्ष्मीची आरती शारदेची श्रीचिन्मयानंद गुरुमालिकेची श्रीविष्णुदासाची श्रीविष्णुदास कवींची श्री गुरुदासाची सदगुरुनाथाची आरती - आरती अकरावी श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : aratipoemvishnudasआरतीकवितापदमराठीविष्णुदास आरती अकरावी Translation - भाषांतर ( चाल : आरति भुवन. )जय जय नदिपति प्रिय तनये । भवानी, महालक्ष्मि, माये ॥ध्रु०॥आदि क्षिरसागररहिवासी । जय जय कोल्हापुरवासीअंबे भुवनत्रयिं भ्रमसी । सदा निजवैकुंठीं वससीदुर्लभ दर्शन अमरांसी । पावसि कशि मग इतरांसी( चाल ) करुणालये मोक्षदानींभक्त जे परम - जाणती वर्म - सदा पदिं नरमकृपेनें त्यांसी सदुपायें । संकटीं रक्षिसि लवलाहे ॥१॥अमरेश्वर विधिहरिहर । मिळाले असुरांचे भारमंदाचल नग रवि थोर । केला वासुकिचा दोरढवळिला सागर गर - गर । रगडिले जलचर मीन मगर( चाल ) लाजती कोटि काम पोटींतुझें सौंदर्य - गळालें धैर्य - म्हणती सुर आर्यजाळितो रतिपति सोसुं नये । होतां जन्म तुझा सुनये ॥२॥त्रिभुवनस्वरुपें तूं आगळी । वरिलासी त्वां वनमाळी तुजसम न मिळे वेल्हाळी । शंकर मकरध्वज जाळीन मिळे स्पर्शहि पदकमळीं । पदरज लागो तरि भाळीं( चाल ) पितांबर शोभतसे पिवळाबहारजरतार - हरिभरतार - तरि मज तारस्तवितां तुज जरि गुणग्रहे । दशशतवदनांही भ्रम ये ॥३॥सनकादिक ब्रह्मज्ञानी । ध्याती चरण तुझे ध्यानींदृढासन घालुनि निर्वाणीं । बैसले महामुनि तपिं - ध्यानींतरी मी मंदबुद्धि जननी । तुझे गुण वर्णुं कसे वदनीं( चाल ) जरी हा विष्णुदास तूझाबहु अपात्र - करी सुपात्र - कृपा तिळमात्रकरोनी मोक्षपदीं वाहे । अंबे लवकर वर दे ये ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP