मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|आरती| आरती दहावी आरती आरती पहिली आरती दुसरी आरती तिसरी आरती चवथी आरती पांचवी आरती सहावी आरती सातवी आरती आठवी आरती नववी आरती दहावी आरती अकरावी आरती महालक्ष्मीची आरती शारदेची श्रीचिन्मयानंद गुरुमालिकेची श्रीविष्णुदासाची श्रीविष्णुदास कवींची श्री गुरुदासाची सदगुरुनाथाची आरती - आरती दहावी श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : aratipoemvishnudasआरतीकवितापदमराठीविष्णुदास आरती दहावी Translation - भाषांतर ( चाल : इस तनधनकी. )जय जय रेणूके आइ, जगदंबे । ओवाळुं आरति मंगळारंभे ॥धृ०॥शुभ मंगलोत्सव मंगळवारींमंगळ वाजंत्रि वाजति द्वारींमंगळकृतजागर समारंभें ॥१॥मंगल मंडपिं तूं राजबाळाशोभति मौक्तिक नक्षत्रमाळाभरजरि झालर नारळ आंबे ॥२॥भडक पितांबर, कंचुकि पिवळीनवरत्नें माणिक - मणि - मोतीं - पवळीतळपति रविशशिंचीं प्रतिबिंबें ॥३॥कुंकुम कंकणालंकृत वायनचंदनचर्चन, अर्चन, गायनउतरति नरनारि तुज लोणलिंबें ॥४॥आदिमूळ माये, तूं विश्वाची राणीलावण्यरुप सौभाग्यशिराणीपहातां तुज देहभान विसंबे ॥५॥जाहलि दुर्लभ भेट आनंदेंपाहिलिं विमल हीं चरणारविंदेंमन विष्णुदासाचें विरो अविलंबें ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP