आरती - आरती सातवी

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


जय जय रेणुके, सदा सदय तूं प्रसन्न रुपमूर्ती
मृगराजाचल पावक अघ नग दाहक महिवर्ती
सिद्ध साधुसम पतित पापि नर नमनें उद्धरती ॥धृ०॥
दिनरक्षक, जगसाक्ष, यशध्वज चुंबित गगनाला
अति उत्कंठित देवमुनी जन येती नमनाला
तारिसी त्यांसी वाटे हे मम कौतुक न मनाला
उदंड तरती मजसम नर जे दुरितें आचरती ॥ जय० ॥१॥
विषयप्रपंचीं गुंतुनि नर जे जगिं वायां गेले
ते अनुकंपामृत - घन वर्षुनि त्वां पावन केले
चंड - मुंड तव शत्रु परंतू मोक्षपदीं बसले
सांप्रत मजप्रति ताराया कां धरिली मनिं अढि ती ॥ जय० ॥२॥
सन्मुख घट स्थापित, लोंबती सुमनांच्या माळा
कंठीं मुक्तहार, कटीं शोभतो पीतांबर पिवळा
वांच्छिति विधि हरिहर त्वत्पदरज लागो भाळा
तव गुणमहिमा भक्त विरामा निशिदिनीं मुखिं गाती ॥ जय० ॥३॥
नवदिनिं नवरात्रीं पर्वतीं वाद्यध्वनि गर्जे
अंब, अंब, जगदंब, उदय, रव दिग्मंडळिं गाजे
जगज्जननि हे दीन दयाळे, नांव तुला साजे
विष्णुदास म्हणे, करि करुणालये, करुणा मजवरती ॥ जय० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP