आरती - आरती पहिली
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
श्रीरेणुके, जय भगवंते, आनंते, अचिंते, जयवंते,
दैत्य - निहंते ॥ श्रीरेणुके जय० ॥
हे शुभवदने ! चित्सुखसदने ! श्रीवरदत्ता श्रीमंते ॥ श्री० ॥धृ०॥
भव अंब उदित, जगदंब मुदित । तूं सुरभि दुधित,
ये एककुदित । सदा आनंदित, सुरवरवंदित, प्रतिपाळ
क्षुधित, निज बाळ रुदित, तुज कां न विदित, हे ह्रदयस्थे ॥१॥
मृगराजाचल शिखर सुमंडित । कोरिभूमि मुळपीठ अखंडित,
चैतन्य कलादिप विश्वकरंडित । पाप ताप दुरदैन्य कुरंडित,
तूं रमापंडित, हे ललिते ॥२॥
श्रीदत्तात्रय योगि शास्त्रकर । सिद्ध देवदेवेश्वर शंकर ।
सन्निध श्रीमहाकाली भयंकर । तूं सिंहासनस्थित करुणाकर
ये लवकर हे भार्गवमाते ॥३॥
सच्चित् घन महा ब्रह्मस्वरुपिणी । सकळ गूणसंपन्न शिरोमणी ।
तूं इंद्रायणी तूं दाक्षायणी । विष्णुदास म्हणे नमो नारायणी ।
हे सत्यज्ञानमनंते ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP