पाचवीची गाणी - सतीराचा साया

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


सतीराचा साया
सतीराचा साया
दुधाले तल्तावरी बालंत बालोती धुवीते
दुरून पाहिला तिचे सासर्‍यानी
सून माझा निंबरा कोमेली
तेला धाडा लाल सतीरा
सतीराचे साये घरी गं आणा
बालोती घलते वलाने-पालाने
(कोमेली-कोमेजली, सतीरा-छत्री, साया-सावली)

छत्रीची छाया
भर दुपारच्या उन्हाने दुधाळ दिणार्‍या तळ्यावर
बाळंतीण धूत होती दुपाअटी
दुरून पाहिले तिच्या सासर्‍याने
माझी सून लिंबोणीगत कोमेजली आहे
पाठवा तिच्याकरिता लालरंगी छत्री
छत्रीच्या छायेत घरी या घेऊन
दुपटी धुतेय उन्हात उलट पालट आपटून
(हे गीत शिणलेल्या बाळंतिणीचे स्वप्नगीत आहे. आदर्श नात्याची तिची कल्पना त्यातून मांडली आहे आपले प्रत्यक्षातील श्रम त्यामुळे टळणार नाहीत पण स्वप्नरंजनातून ते किमान हलके होतील अशी आशा तिच्या मनात आहे.)


Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:56:24.0130000