पाचवीची गाणी - बालाचा अगसेर

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


बालाचा अगसेर
सटेचा सटकारा ब्रहम्याचा लिव्हना
सटीब्रह्या आला बालंतिनीचे ओटीवं
बालंतिनीनं ओटा सारवेला सुरवेला
सटीब्रहम्याचे मनाला खुशी गं झाला
बालाचा अगसेर कथं लिव्हेला?
बालाचा अगसेर मुरी लिव्हेला!
बालाचा अगसेर कथं लिव्हेला?
बालाचा अगसेर डोफ़ी लिव्हेला!
बालाचा अगसेर कथं लिव्हेला?
बालाचा अगसेर साती लिव्हेला!
बालाचा अगसेर कथं लोव्हेला?
बालाचा अगसेर डोकी लिव्हेला!
(अगसेर-अक्षर, मुरी-टाच, डोफ़-गुडघा, साती-छाती)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:56:20.6400000