पाचवीची गाणी - मोंगरा

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


मोंगरा
मोंगरा
बालाचे न्हानीवं बाय् न्हानीवं ग
मोंगरा जलमेला ये s
मोंगर्‍याचा फ़ूल बाय् फ़ूल ग
दिसती बगुलू हो ये s
(जलमेला-जन्मला, बगुलू-बागळ्यासारख्या शुभ्र रंगाचे)

मोगरा
बाळाच्या आंघोळीच्या जागी
एक मोगर्‍याचे रोप उगवले;
त्या मोगर्‍याला आले फ़ूल
बगळ्यासारख्या शुभ्र रंगाचे!

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:56:22.4200000