पाचवीची गाणी - दाराचे दारकशी

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


दाराचे दारकशी
दाराचे दारकशी
दाराचे दारकशी, दाराचे दारकशी गs, दारी उभा कोण आहे?
दारी उभा सासरा आहे
घरी आहेत बालंतुल्या सुना तुमच्या!

दाराचे दारकशी, दाराचे दारकशी गs, दारी उभा कोण आहे?
दारी उभा सासू आहे
घरी आहेत बालंतुल्या सुना तुमच्या!
(दारकशी-दाराची चौकट)

दाराच्या चौकटी
अगं दाराच्या चौकटी, दाराशी कोण उभा आहे?
दाराशी सासरा उभा आहे...
त्याला सांग, तुझी सून माहेरी बाळंत झाली आहे!

अगं दाराच्या चौकटी, दाराशी कोण उभा आहे?
दाराशी सासू उभा आहे...
त्याला सांग, तुझी सून माहेरी बाळंत झाली आहे!

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:56:23.4830000