पाचवीची गाणी - उंबराचा फ़ुलू

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


उंबराचा फ़ुलू
उंबराचा फ़ुलू
सात भावांची एखली बहीण
मांगते उंबराचा फ़ुलू
सारवेली उंबराचे बना
सात गं राती राखीयेला
नाय मिलं उंबराचा फ़ुलू

उंबराचे फ़ूल
सात भावांची एकुलती एक बहीण
भावांकडे मागते उंबराचे फ़ूल
भाऊ उंबराचे बन सारवतात
सात राती राखण करतात
तरी त्यांना मिळत नाही उंबराचे फ़ूल
(उंबराला रात्री फ़ूल येते व ते सोन्याचे असते, असा समज आहे. प्रत्याक्षात उंबराला फ़ूल कधीच येत नाही. ’उंबराचे फ़ूल’ ही संकल्पना दुर्मिळ, अप्राप्य गोष्टींसाठी वापरली जाते.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T20:56:21.8270000