मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग १९१ ते २०० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग १९१ ते २०० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग १९१ ते २०० Translation - भाषांतर १९१सांडोनि अभिमान जालों शरणागत । ऐसियाचा अंत पहासी काई ॥१॥माझे गुणदोष मनीं गा न धरीं । पतित पावत जरी म्हण्नविसी ॥२॥पडविलिया पापराशी झणीं देसी देवा । हे लाज केशवा कोणास जी ॥३॥नामा म्हणे देवा चतुरा शिरोमणी । निकुरा जासी झणीं मायबापा ॥४॥१९२जाणसी तें करीं कृपाळुवा हरि । लाज सर्वांपरी आहे तुज ॥१॥आरूष साबडें मी कांहीं नेणें वेडें । जन्मोनि सांदडें केलें तुज ॥२॥बहुकीर्ति ऐकिली बहुतांचे मुखीं । बहुत केले सुखी शरणागत ॥३॥नाहीं तुझी सेवा केली मनोभावें । लोभ दंभ गर्व भ्रांति सदा ॥४॥नामा म्हणे मज होताती विपत्ति । सोडवीं श्रीपति येथोनियां ॥५॥१९३भिऊनि निघिजे समर्थाचे पोटीं । विषयांची तो भेटी नको मज ॥१॥तैसा मी शरण आलों रे केशवा । मज त्वां राखावें पायांतळीं ॥२॥नको उदासीन राखों अभिमान । माझें आगमन विचारीं कां ॥३॥तुझेनि होईल तेंच मी मागेन । न सोडीं चरण अहर्निशीं ॥४॥अविद्या अपारा संचरली देवा । आम्हासि कुढावा नाहीं कोणी ॥५॥देवा आतां मज नको गर्भवास । नामा विष्णुदास विनवितसे ॥६॥१९४वासनेचा फांसा पडिला माझें कंठीं । हिंडलों जगजेठी नाना योनी ॥१॥सोडवीं गा देवा दीनदयानिधी । मी एक अपराधी दास तुझा ॥२॥शरण आलियाचे न पाहसी अवगुण । कृपेचें लक्षण तुज साजे ॥३॥त्रिभुवनीं समर्थ उदार मनाचा । कृपाळू दीनांचा ब्रीद तुझें ॥४॥गजेंद्र गणिकेची राखिलीं तुंवां लाज । उद्धरिला द्विज अजामेळ ॥५॥नामा म्हणे देवा अव्हेरितां मज । जगीं थोर लाज येईल तूंतें ॥६॥१९५देवा तुझी अवज्ञा घडे । तयाचे दास होती वांकुडे ।व्याधिविण देह पीडे । बुडे सागरीं चितेच्या ॥१॥देवा तूं होसी उदासीन । तरी हांसती सकळैक जन ॥२॥देवा तूं नाहींस जयाचेंज चित्तीं । सोनें धरिल्या होये माती ।पीक न पिके तयाचे शेतीं । पेंवीं पाणी रिघतसे ॥३॥सेवा करी जयाचे घरीं । तींचि होतीं पाठमोरीं ।इष्टमित्र सज्जन सोयरीं । आप्त वैरी होऊनि ठाके ॥४॥ठेवा ठेविला चुके आपण । मागतोचि मागे जाण ।सत्यास घडे आपदास्तपण । बोले तितुकें लटिकेची ॥५॥ऐसा अनुभव घडला मज । म्हणोनि बा शरण आलों तुज ।नामा म्हणे केशिराज । कृपा करीं दातारा ॥६॥१९६तुज गीतीं गातां न येसी पांडुरंगा । प्रेमेंचि दडूं गा पायांपाशीं ॥१॥वांकडें तिकडें जैसें आलें तैसें । गावया उल्हास उगवला ॥२॥त्याचि भरें तोंडा आलें तें बोलतों । नाम मुखीं घेतों अखंडित ॥३॥तुझा म्हणवितों सांभाळावें देवा । नामया केशवा सर्वकाळ ॥४॥१९७अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी । पतितपावन प्रौढी तुझी देवा ॥१॥माझिया निदैवें ऐसेंचि घडलें । तूं तंव आपुलें न संडिसी ॥२॥सहस्त्र अपराध घालीं माझें पोटीं । तारीं जगजेठी नामा म्हणे ॥३॥१९८देवा माझें मन ठेवीं तुझे चरणीं । घालीं माझें नयनीं रूप तुझें ॥१॥मज या लोकांचा शीण असे मनांत । तुजचि चिंतित ह्रदयकमळीं ॥२॥चंदनाच्या दृतीं वेधले तरूवर । सबाह्य अभ्यंतर काय जालें ॥३॥सरिता सिंधुमाजी मिळोनि लपाली । सागरची जाली एकसरें ॥४॥लवण जळाचें प्रसिद्धचि असे । ऐक्यभावें वसे न दिसे कांहीं ॥५॥नामा म्हणे शरण आलों केशिराजा । ऐसा भावो माझा करी वेगीं ॥६॥१९९तत्त्व पुसावया गेलों वेदज्ञासी । तंव भरले त्यापासीं विधिनिषेध ॥१॥तया समाधान नुपजे कदा काळीं । अहंकार बळि जाला तेथेम ॥२॥म्हणोनि तुझें नाम धरिलें शुद्धभावें । उचित करावें पांडुरंगा ॥३॥स्वरूप पुसावया गेलों शास्त्रज्ञासी । तंव भरले तयापाशीं भेदाभेदा ॥३॥एकएकाचिया न मिळती मतासी । भ्रांत गर्वराशि भुलले सदा ॥५॥पुराणिकासी पुसूं स्वरूपाची स्थिति । तंव त्यासी विश्रांति नाहीं कोठें ॥६॥विषयीं ठेवुनि मन सांगति ब्रह्मज्ञान । तेणें समाधान नुपजे कदा ॥७॥हरिदासासी पुसूं भक्तीच उपाव । तंव तयापाशीं भाव नाहीं कोठें ॥८॥वाचेंनें सांगती नामाचा बडिवार । विषयीं पडीभर सदाकाळीं ॥९॥ऐसें विचारितां बहुत भागलों । म्हणोनि शरण आलों पांडुरंगा ॥१०॥भयभीत जालों संसार येरझारीं । शिणलों असें भारी तारीं मज ॥११॥नामा म्हणे आतां हिंडतां कष्टलों । म्हणोनि शरण आलों पांडुरंगा ॥१२॥२००संसारी गांजलों म्हणोनि शरण आलों । पाठीसि रिघालों देवराया ॥१॥कळिकाळा वास पाहूं तूं न देसी । भरंवसा मानसीं आहे मज ॥२॥नामा म्हणे देवा स्वामिया तूं एक । आवडता सेवक करीं मज ॥३॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP