मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग १७१ ते १८० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग १७१ ते १८० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग १७१ ते १८० Translation - भाषांतर १७१ब्रह्म अविनाश आणि आनंदघन । त्याहुनि चरण गोड तुझे ॥१॥तें जीवें न सोडी अगा पंढरीनाथा । जाणसी तत्त्वतां ह्रदय माझें ॥२॥परात्पर वस्तु ध्याईजे अपारापार । त्यांचे हें जिव्हार पाय तुझे ॥३॥सच्चिदानंदघन जेथें हरपे मन । त्याहूनि चरण गोड तुझे ॥४॥नामा म्हणे तुझें पाउल हें सार । तें माझें माहेर विटेवरी ॥५॥१७२तुझिया चरणाचें तुटतां अनुसंधान । जाती माझे प्राण तत्क्षणीं ॥१॥मग हें ब्रह्मज्ञान कोणापें सांगसी । विचारीं मानसीं केशिराजा ॥२॥वदनीं तुझें नाम होतांचि खंडणा । शतखंडरसना होइल माझी ॥३॥सांवळें सुंदर रूप तुझें दृष्टी । न देख्तां उन्मळती नेत्र माझे ॥४॥तुज परतें साध्य आणिक साधन । साधक माझें मन होईल भ्रान्त ॥५॥नामा म्हणे केशवा अनाथाचा नाथ । झणीं माझा अंत पाहसी देवा ॥६॥१७३देवा माझें मन करोनि स्वाधीन । निमोले स्वामीपण भोगिसीना ॥१॥फुकाचा कामारा वोळगे निरंतर । न घाली तुज भार कल्पनेचा ॥२॥तुज नलगे देणें मज नलगे मागणें । असेन अनुसंधानें चरणाचेनि ॥३॥नामा म्हणे केशवा तूं सर्व जाणता । समयींच्या उचिता चुकों नको ॥४॥१७४तुझिये चरणीं असती दोनी भाव । तरीच हा जीव नरककुंडीं ॥१॥बोल बोले एक मनीं असे आणिक । तरी तयासी देख दोनी बाप ॥२॥तुजविणा सुख आणिकांचें मानी । तरी मज जननीज दोनी देवा ॥३॥नामा म्हणे माझा सत्याचा साहाकारी । आस मी न करी आणिकांची ॥४॥१७५पाहुनि न दिसे लौकिक वेव्हारीं । ऐसा तूं अंतरीं लावीं मज ॥१॥परि तुझ्या चरणीं माझें अनुसंधान । तरी प्रेम पावन देईं देवा ॥२॥मनाचिये वृत्तीं अखंड तूं राहोनी । झेंपावती झणीं कामक्रोध ॥३॥नामा म्हणे ऐसे पावसी तूं मातें । तरी मी जीवें तूतें व विसंबें ॥४॥१७६तुझे पायीं माझ्या मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं वेडावलीं ॥१॥आतां विषयसुख जाणावें कवणें । जाणोनि भोगणें कवणें स्वामी ॥२॥देह सहज स्थिति राहिले निष्काम । ह्रदयीं सदा प्रेम ओसंडत ॥३॥नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करींज मज ॥४॥१७७आतां होणार तें होवो पंढरीनाथा । न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥ह्रदयीं तुझें ध्यान वाचे जपें नाम । हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥आम्हीं तुझी देवा धरियेली कांस । न करी उदास पांडुरंगा ॥३॥नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज ॥४॥१७८विषय तडातोडी करि माझे मन । राहिलें म्हणोन तुझे पाइं ॥१॥नको नको देवा वासनेचा संग । मज आला दुभंग नारायणा ॥२॥कामक्रोधलोभ वैरि पाठी लागियेती । झणीं त्याचे हाति देसी मज ॥३॥नामा म्हणे होसि अनाथ कोंवसा । ब्रिदें जगदिशा वर्णिताती ॥४॥१७९अपत्याचें हित किजे त्या जनकें । जरी वेडें मुकें जालें देख ॥१॥तैसें मी पोसणें तुझें जिवलग । अंतरींची सांग खूण कांहीं ॥२॥राखीन मी नांव तुझें सर्वभावें । चित्त वित्त बळी देईन पायीं ॥३॥जरी दैवहीन म्हणसी मजला । तरी लाज कवणाला म्हणे नामा ॥४॥१८०देह जावो हेंचि घडी । पाय हरिचे न सोडी ॥१॥क्लेश होत नानापरी । वाचे रामकृष्ण हरी ॥२॥नाचूं वैष्णवांचे मेळीं । हांक विठ्ठल आरोळी ॥३॥नामा म्हणे विठोबासी । जें तें घडो या देहासी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP