मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग ४१ ते ५० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग ४१ ते ५० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग ४१ ते ५० Translation - भाषांतर ४१हिरे जळामधीं भिजतील कधीं । तैसें कृपानिधी केलें आम्हां ॥१॥आमुचा विकल्प आमुचा विकल्प । आमुचा विकल्प आम्हां नाडी ॥२॥कामधेनु संगें गाढव बांधिलें । तयाचें तें मोलें तुके केवि ॥३॥काय म्यां करावें पाठी लागे भोग । नामा म्हणे योग तुझ्या हातीं ॥४॥४२आशा मनिषा तृष्णा लागलीसे पाठीं । धांव जगजेठी स्वामी माझ्या ॥१॥गेलासि केउता वाढिलें दुश्चिता । अगा कृपावंता स्वामी माझ्या ॥२॥नामा म्हणे मज नाहीं कोण गत । तारिसी अनंत स्वामी माझ्या ॥३॥४३तुजविण आम्हां कोण हो पोषिता । अहो जी कृपावंता पंढरिराया ॥१॥न करीं विठ्ठला आतां लाजिरवाणें । मी तुझें पोसणें पांडुरंगा ॥२॥काकुळती कोणा येऊं हो मी आतां । अनाथाचे नाथा विठ्ठला तूं ॥३॥एक वेळ आतां पाहे मजकडे । नामा म्हणे वेडें रंक तुझें ॥४॥४४माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा ॥१॥नाहीं नाहीं मज आणिक सोयरा । न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥अनाथाचा नाथ होसी तूं दयाळा । किती वेळोवेळां प्रार्थू आतां ॥३॥नामा म्हणे जीव होतो कासावीस । केली तुझी आस आतां बरी ॥४॥४५समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हांसती सकळ लाज कोणा ॥१॥देव आप्त दैन्य उरे कैंचे बापा । आम्हांसि तूं कां पां विसरलासी ॥२॥ऐसा तूं अविनाश त्रिभुवनिंचा राजा । नामा म्हणे माझा तूंचि स्वामी ॥३॥४६आम्ही काय जाणो तुझा अंत पार । होसी तूं साचार निवारिता ॥१॥बहु अपराधी जाण यातिहीन । पतितपावन पांडुरंगा ॥२॥नामा म्हणे ऐसा पाताकी पामर । करिसी उद्धार साच ब्रीद ॥३॥४७नेणे घातमात नव्हे कळावंत । शास्त्रज्ञ पंडित तोहि नव्हे ॥१॥रंकाहुनि रंक संतांचा सेवक । मी नामधाराक विठोबाचा ॥२॥नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशीळ । नव्हे मी वाचाळ तर्कवादी ॥३॥नामा म्हणे राया विठोचा डिंगर । नामें पैलपार पावविलों ॥४॥४८लटिका मी गाईन लटिका मी नाचेन । संतासि देखोन लटिका लवें ॥१॥लटिका माझा भाव लटिकी माझी भक्ति । तूं तंव श्रीपती कृपासिंधु ॥२॥लटिकी माझी क्रिया लटिकें माझें कर्मा । परि सत्य तुझें नाम गातु असे ॥३॥लटिकें माझें ध्यान लटिकें माझें ध्यान । तूं तंव सहजगुण सत्यरूप ॥४॥लटिकी माझी पूजा लटिकें माझें स्मरण । लटिकें माझें भजन भावहीन ॥५॥लटिकें प्रेमवत्स धेनु हें स्वीकारी । तैसें मज करीं म्हणे नामा ॥६॥४९आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया । ऐसें हें कासया पाहसी देवा ॥१॥जाणतां नेणतां नाम तुझें देवा । गाईन केशवा आवडीनें ॥२॥विषयीं आसक्त भ्रांत माझें मन । कैसें तुझें भजन घडेल मज ॥३॥नामा म्हणे आतां जाणसी तें करीं । पतितपावन हरि नाम तुझें ॥४॥५०लटिका तरी गाईन तुझेंचि नाम । लटिकें प्रेम आणीन तुझें ॥१॥सहजचि लटिकें असे माझें ठायीं । तुझिया पालट नाहीं साचपण ॥२॥लटिकें तरी हरी करी तुझें ध्यान । लटिकें माझें मन तुजचि चिंती ॥३॥लटिकें तरी बैसे संतांचें संगतीं । दृढ धरीन चित्तीं नाम तुझें ॥४॥लटिका तरी तुझा म्हणविन दास । धरीन विश्वास नामीं तुझें ॥५॥लटिकें माझें मन सुफळ करी देवा । नामा म्हणे केशवा विनती माझी ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP