मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग ६१ ते ७० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग ६१ ते ७० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग ६१ ते ७० Translation - भाषांतर ६१घालूनि आसन साधिला पवन । घेतलें जीवन अंतरिक्षीं ॥१॥पराहस्तें तृप्ति नव्हे जी दातारा । कृपा करुणा करुणा करा केशिराजा ॥२॥जीवाचें जीवन तूं सर्वांचें कारण । धांव मजालागुन केशिराजा ॥३॥अनाथाचा नाथ हेंज ब्रीद साचार । झणें माझा अव्हेर करिसी देवा ॥४॥विष्णुदास नामा अंकियेला तुझा । विनवी केशिराजा प्रेमसुखें ॥५॥६२ज्याचिया रे मनें देखियेलें तुज । त्याची लोकलाज मावळली ॥१॥नाहीं तया क्रिया नाहीं तया कर्म । नाहीं वर्णाश्रम सुखदुःख ॥२॥नाहीं देह स्फूर्ति जाती कुळ भेद । अखंडा आनंद ऐक्यतेचा ॥३॥नामा म्हणे त्याचे चरणरज व्हावें । हेंचि भाग्य द्यावें केशिराजा ॥४॥६३येतां जाता थोर कष्टलों गर्भवासीं । पडिलों गा उपवासी प्रेमेंविण ॥१॥बहुतांचा सेवका जालोंज काकुळती । न पावें विश्रांती तयाचेनी ॥२॥ऐसें माझें मन शिणलें नानापरी । घालीन आभारीं संताचिया ॥३॥वियोगें संतांच्या व्याकुळ चिंतातुर । हिंडें दारोदार दीनरूपें ॥४॥परि कोणी संतांच्या न घालिती चरणीं । तळमलीं अनुदिनीं अश्रांत सदा ॥५॥माझें माझें म्हणोनि जया घालीं मिठी । दिसे तेचि दिठीं नाहीं होय ॥६॥तया शोकानळें संतप्त आंदोळें । गेलें तें न मिळे कदाळाळीं ॥७॥न देखत ठायीं देखावया धांवें । भ्रांती भुललें भावें नानामार्गीं ॥८॥तुझा स्वरूपानंदु नाहीं वोळखिला । जाली ते विठ्ठला हानि थोर ॥९॥लोहाचा कवळु लागला परिसातें । पढिये सर्वांतें होय जेवीं ॥१०॥नामा म्हणे तैसी भेटी संतचरणीं । करूनि त्रिभुवनीं होईन सरता ॥११॥६४धांउनियां मिठी घालीन संतचरणीं । सांगे वचनींचे गुज तुम्हां ॥१॥विठोबाच्या गांवा यारे मनीं येकवेळां । फारा आहाळला जीव माझा ॥२॥आनंदाचें जीवन पाहिन श्रीमुख । शोकमोहदुःख हरती माझे ॥३॥विटेसहित चरण देईन आलिंगन । तेणें माझी तनु वोल्हावेल ॥४॥तुम्ही माझे आवडते अंतरंग । माझे जिवलगा प्राणसखे ॥५॥नामा म्हणे विठो कृपेची माउली । तेव्हां ते साउली करिल मजा ॥६॥६५वाल्मिकादि भीष्म द्रोण कृपाचार्य । द्रुपदतनया दिली भेटी ॥१॥उद्धव नारदा अंबरिष शुक । बळी धरुवादिक आले भेटी ॥२॥देवी देवऋषी गोपाळांसहिता । भाष्यकारें नीत शुद्ध केली ॥३॥नामा म्हणे आतां पाहूं नको देश । पतितास यश तुझे नामीं ॥४॥६६भक्तांची आवडी मोठी त्या देवासी । सद्भक्तिप्रेमासी लांचावला ॥१॥काय सांगूं आतां तयांचें तयांचें कौतुक । जेथें ब्रह्यादिक स्तब्धा ठेले ॥२॥गज आणि गणिका भिल्लिणी कुंटिणी । नेल्या त्या विमानीं बैसोनियां ॥३॥अजामीळ खळ कोळी तो वाल्मिक । तारिले अनेक एकसरां ॥४॥धर्माचिये घर्रीं उच्छिष्ट काढी । जाहाला बराडी देवराव ॥५॥नामा म्हणे कांहीं मागेना तो देव । मुख्य पाहे भाव दृढ त्याचा ॥६॥६७जैसा वृक्ष नेणे मान अपमान । तैसे ते सज्ज्न वर्तताती ॥१॥येऊनियां पूजा प्राणि जे करिती । त्याचें सुख चित्तीं तया नाहीं ॥२॥अथवा कोणी प्राणि येऊनि तोडिती । तयाअ न म्हणती छेदूं नका ॥३॥निंदा स्तुति सम मानिती जे संत । पूर्णा धैर्यवन्त सिंधु ऐसे ॥४॥नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी । तरी जीव शिवा मिठी पडुनि जाय ॥५॥६८मंत्रयंत्र दीक्षा सांगातील लक्ष । परि रामा प्रत्यक्ष न करी कोण्ही ॥१॥प्रत्यक्ष दावील रामा धरीन त्याचे पाय । आणिकांचीं काय चाडा मज ॥२॥सर्व कामीं राम भेटविती मातें । जीवेंभावें त्यांतें ओवाळीन ॥३॥नामा म्हणे आम्हां थोर लाभ जालाअ । सोईरा भेटला अंतरींचा ॥४॥६९कैसा पांडुरंगा करावा विचार । सांग बा विर्धार साक्षरूपा ॥१॥काय आलें देवा कैचें थोरपण । आकारासि कोणी आणियलें ॥२॥आणियलें आतां आपणासारिखें । गोपिकांसी रूपें दावी नाना ॥३॥काय जीवेंभावें सकाळां संमता । सगुण अनंत म्हणे नामा ॥४॥७०बाप संतसभा भली । बहुता पुण्यें जोडिली ।ह्रदयींची गोवी आपुली । संताप्रति निवेदीन ॥१॥आजि प्रसंग हरिभक्तीचा । हरि स्वभावें उच्चारु वाचा ।विठोबा ऋणिया रे भक्तांचा । ऋण फेडितो भक्तांचें ॥२॥अरे हा अनादिचा लागु करी । अरे जन्माची उभरी भरी ।आमुचा लागिया श्रीहरी । दो उत्तरीं निवडावा ॥३॥आतां असो हा कर्मविभागु । आम्ही मागूं आपुला लागूं ।जरि हा म्हणेल निःसंगु । तयासी आम्हांसी संबंध कायसा ॥४॥जरि हा न लगे आमुचें ऋण । हातीं घेऊनि सुदर्शन ।आम्ही करूं हरिकीर्तन । तेथें तिष्ठत कां उभा ॥५॥मागें चाळविलि या रिति । परि आम्हांसि आलिया प्रचीति ।ज्यासि हरिची सोय संगती । तयासि न मनें अन्य स्थळ ॥६॥हरि कौसाळ मल्ल म्हण्ती । ते अवघी रे जाणाची भ्रांति ।सेवा हरिची सांगताती । संत होती हरिकडे ॥७॥आणिक एकू आम्हांसी आठवलें । आम्ही भांडूकरे एकले ।आमुचें केलें काय चाले । य हरिभक्तां वांचूनि ॥८॥जे हरिभक्ति विरहित । त्यांचें हरिचरणीं न बोधो चित्त ।अवघे मिळूनि हरिचे भक्त । हरि व्हावा म्हणताती ॥९॥आणिक एक नवल परि । जो याची सेवा करी ।त्याचें सर्वस्व हरी । आणि श्रिहरि नाम मिरवतु ॥१०॥हरि आळवितां मागा उभा । आठवितां पुढें उभा ।हरि ध्यातां ह्रदयीं उभा । हें तंव सभा विचारा ॥११॥आमुचें हो तेंच तुम्हीं विनवावें । आम्हांसि मानलें आघवें ।किती येरझारीं शिणवावें । शरण रिघावें श्रीहरी ॥१२॥विश्व श्रीहरिचें आघवें । म्यां गार्हाणें कवणाशीं द्यावें ।लागे तासिच मागावें । हरिविण ठावो नसे वो ॥१३॥वीरराया पंढरीनाथा । आतां अपंगावें शरणागता ।जरी उपेक्षिसी सर्वथा । वाट कोणाची पहावी ॥१४॥नको नको निंदा स्तुति । हाचि भावो हेचि भक्ति ।मज नेदी पुनरावृत्ति । विष्णुदास म्हणे नामा ॥१५॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP