मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीनामदेव चरित्र| अभंग १३१ ते १४० श्रीनामदेव चरित्र अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० श्रीनामदेव चरित्र - अभंग १३१ ते १४० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग १३१ ते १४० Translation - भाषांतर १३१मरण सांगा स्वामी कवणियां गुणें । संसारीं मरण उरलें नाहीं ॥१॥आम्हां मरण नाहीं मेलें होतें काई । श्रीगुरुच्या पायीं राहे मना ॥२॥मरणें हें काया मरणें हें माया । मरे हे छाया कवण्या गुणें ॥३॥भक्ति अमरकंदु रामनाम वंदूं । नामयासी छंदू विठोबाचा ॥४॥१३२नामा स्वयेंपाक करुं बैसला । केशव श्वानरूपें आला ।रोटी घेऊनि पळाला । सर्वांभूतीं केशव ॥१॥हातीं घेऊनि तुपाची वाटी । नामा लागला श्वानापाठीं ।तूप घे गा जगजेठी । कोरडी रोटी कां खाशी ॥२॥तंव श्वान हांसोनी बोलिले । नामया तुज कैसें कळलें । येरू म्हणे खेचरें उपदेशिलें । सर्वांभूतीं विठठल ॥३॥१३३सद्गुरुनायकें पूर्ण कृपा केली । निजवस्तु दाविली माझी मज ॥१॥माझें सुख मज दावियेलें डोळां । दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ॥२॥तया उतराई व्हावें कवण्या गुणें । जन्म नाहीं येणें ऐसें केलें ॥३॥नामा म्हणे निकीज दावियेली सोय । न विसरावे पाय विठोबाचे ॥४॥१३४पाषाणाचा देव बोलेचि ना कधीं । हरि भवव्याधि केंवि घडे ॥१॥दगडाची मूर्ति मानिला ईश्वर । परि तो साचार देव भिन्न ॥२॥दगडाचा देव इच्छा पुरवीत । तरि कां भंगत आघातानें ॥३॥पाषाण देवाची करिती जे भक्ति । सर्वस्वा मुकती मूढपणें ॥४॥प्रस्तराचा देव बोलत भक्तांतें । सांगते ऐकते मूर्ख दोघे ॥५॥ऐशांचे माहात्म्य जे कां वर्णिताती । आणिज म्हणविती तेणें भक्त ॥६॥परंतु ने नर पामर जाणावे । त्यांचे नायकावे बोल कानीं ॥७॥धोंडा घडोणियां देव त्याचा केला । आदरें पूजिला वर्षें बहु ॥८॥तरी तो उतराई होय केव्हां काई । बरवें ह्र्दयीं विचारा हें ॥९॥धोंडापाण्याविण नाहीं देव कोठें । होतां सान मोठें तीर्थ क्षेत्र ॥१०॥बाराशीचे गांवीं जाहला उपदेश । देवाविण ओस स्थळ नाहीं ॥११॥तो देव नामया ह्रदयीं दाविला । खेचरानें केला उपकारु हा ॥१२॥१३५कृपेची साउली अखंड लाधली । खेचर माउली भेटलिया ॥१॥आतां मज भय नाहीं पैं कोणाचें । जन्ममरणाचें दुःख गेलें ॥२॥बंधमोक्षाची फिटली काळजी । समाधि लागली समाधीसी ॥३॥नामा म्हणे माझें सर्वही साधन । खेचर चरण न विसंबे ॥४॥१३६भक्ति हेंचि भाण परब्रह्म पक्वान्न । गुरुमुखें जेवण येवियेलें ॥१॥अनुभव भात लयालक्ष कढी । जेवणारा गोडी घेत असे ॥२॥सुखशांति शाखा भावर्थ हा वडा । जेवणार गाढा आत्माराम ॥३॥दया क्षीरधारी शांती पूर्णपोळी । घृत हें कल्होळी प्रेम माझें ॥४॥विषयाचा गुरळा थुंकोनी सांडिला । नामा आंचवला संसारासी ॥५॥१३७स्वानंदांत पडोनियां जाती । न संडी वासना चघळित हस्ती ॥१॥तैसें माझें मन मुरारी । वासना धांवे विषयावरी ॥२॥डोळियांचीं बुबुळें फुटोनियां जाती । न संडी वासना हालवितो पातीं ॥३॥ढोराचें पुच्छ मोडोनियं चांगा । पुढती पुढती हालविती पैं गा ॥४॥वोढाळ ढोरा बांधियेलें काष्ट । पुढती पुढती धरी तीच वाट ॥५॥नामा म्हणे माझी मुळीं वासनाच खोटी । खेचर विसा चरणीं घातलिले मिठी ॥६॥१३८)सूर्याचा प्रकाश सर्व सृष्टीवरी । धन्य तो अंतरीं सर्वकाळ ॥१॥स्वर्गादि पाताळ सर्व पूर्ण जळें । चातका न मिळे मेघाविण ॥२॥नारायय्न पूर्ण सर्वभूतां ठायीं । अभाग्यासी नाहीं तिहीं लोकीं ॥३॥नामा म्हणे गुरुकृपेचें अंजन । पायाळासी धन दिसें जैसें ॥४॥१३९सुखाचे सोयरे भेटती अंतरीं । बाहेरी भितरीं दिधलें क्षेम ॥१॥सुखाची गवसणी घालोनियां मना । विठ्ठलीं वासना बोल्हावली ॥२॥वाचे उपरम मन जालें तन्मय । लागलासे लय पर लक्षीं ॥३॥शांति क्षमा दया देती आलिंगन । चित्त समाधान पावविलें ॥४॥परतलिया दृष्टी इंद्रियांच्या वृत्ती । पावली विश्रांति ठाईंच्या ठाईं ॥५॥विष्णुदास नामा निजबोधें निवाला । खेचरें दिधला अभयकर ॥६॥१४०सद्गुरुचे पाय जीवें न विसंबावे । मन वळवावेंज वृत्तिसहित ॥१॥डोळियाचे डोळे उघडिले जेणें । आनंदाचें लेणें लेवविलें ॥२॥जन्ममरणाचें फेडिलें सांकडें । कैवल्यचि पुढें दाखविलें ॥३॥मोहरले तरु पुष्पफळभारें । तेचि निर्विकार सनकादिक ॥४॥नामा म्हणे स्वामी खेचर माउली । कृपेची साउली केली मज ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP