मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीनामदेव चरित्र| अभंग १११ ते १२० श्रीनामदेव चरित्र अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० श्रीनामदेव चरित्र - अभंग १११ ते १२० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग १११ ते १२० Translation - भाषांतर १११श्रीविठ्ठलें आपुल्या मुखवचनें । नामदेवासी करी अज्ञापन ।होवोनि दीनाचें अति दीन । सद्गुरूसी शरन रिघावें ॥१॥जोडल्या सद्गुरुकृपालेश । मग सर्वत्र माझाचि प्रकाश ।तुज मज भेदाचा भासज । तो निरसोन जाईल ॥२॥नामा म्हणे तुजसी । पावावया सेविजे सद्गुरूसी ।तो तूं रोकडा जोडिलासी । आतां सद्गुरुसी काय काम ॥३॥फळ तरूवर शिखरींज । म्हणोनि आरोहण कीजे त्यावरी ।तें फळ अवचिता जोडिलें करीं । मग तयावरी कासया चढावें ॥४॥मगा श्रीहरी म्हणे अज्ञान । सांडून सेविजे गुरुचरण ।तुझ्या प्रेमें माया सोंग धरून । लटिका तुजपाशीं मी खेळें ॥५॥जंव सद्गुरूचें नाहीं सेवन । तंव मी जैसें स्वप्नीचें धन ।माझें न तुटे भवबंधन । सद्गुरुआज्ञेवांचूनी ॥६॥तेणें नामा सद्गदित जाला । विठोबाच्या चरणीं लागला ।कोण गुरु पाहिजे केला । तें सांगिजे स्वामिया ॥७॥मग श्रीविठ्ठल म्हणे ऐक आतां । सांगेन सद्गुरुची वार्ता ।त्वां पाहोनि तत्त्वतां । शरण तात्काळ रिघावें ॥८॥भक्तीचें नेणें लक्षण । कृपामंद दयाहीन ।इतरांचे अवगुण । अखंड मुखीं जल्पती ॥९॥मी एक जाणता सर्वांठायीं । सर्व शिकविलें म्यांचि पाही ।ऐसें बोलती जनप्रवाही । महंतीलागीं ॥१०॥देखिलिया सज्जन । त्यासी करी सन्मान ।सभा देखोनियां छळण । करी करवी तयाचें ॥११॥लांडें लटिकें गद्य पद्य । पुसोनी होती श्लघ्य ।नेणें तरी हांसोनि निंद्य । बोलती ह्मा गुरूसी ॥१२॥तो जरी सांगे खरें । त्यासी बोलती बरें बरें ।सभाजनांसी नेत्रद्वारें । अशुद्धता दाविती ॥१३॥आपण न सांगती आपुलें गुज । पुढल्यासी म्हणती नकळे तुज ।ऐसें संदेह करणीचें मोज । वाटे तया ॥१४॥शिष्य करितां उल्हासती । शिष्य होई म्हणोनि उपदेशिती ।नानापरी बोधिती । सेवेलागीं ॥१५॥शिष्य करिती बहुवसा । त्यांच्या सेवेची करिती आस ।जो न भजे त्यास । शिव्याशाप देताती ॥१६॥तंत्र मंत्र उपदेशिती । ध्यान आसनीं गोविती ।देवा ब्राह्मणा न भजती । आचारभ्रष्ट जे ॥१७॥धातु विद्येची धरिती गोडी । जारणमारणाची अति आवडी ।विषयवासनेची हुंडी । अखंड जीवीं ॥१८॥ज्ञान गर्वाचा महिमा बरवा । श्रीगुरु ऐशा अखंड भावा ।शिष्यसमुदाय देखोनि गर्वा । थोरीवेचा मानिती ॥१९॥असो बहु ऐसें कथान । परी सद्गुरु कृपाधन ।त्याचें ऐक महिमान । सावध चित्तें ॥२०॥ज्यासी गुरूत्वाचे नाहीं काज । शिष्य भजतां वाटे लाज ।उदास वृत्ति सहज । निर्मळ भोळा ॥२१॥निंदा स्तुति समान । बोलती भेदिती कठिण वचन ।कधीं न होती क्रोधायमान । कवणाहीवरी ॥२२॥जे नेणती खरें खोटें । समान वाटे सान मोठें ।सुखदुःखाचे चपेटे । न शिवती कदाकाळीं ॥२३॥शिष्य करितां आळस चित्तीं । केलिया सर्वस्व निरोपिती ।कांहीं थोरीव नाहींच चितीं । महत्त्वाची ॥२४॥सज्जन देखोनी आनंदती । त्याचे गुणागुण न विचारिती ।जीवें भावें इच्छिती । साधुसंग ॥२५॥आपुला कष्टवुनी देहो । ज्ञान कर्काचा कलहो ।साधुसेवेचा मनीं लाहो । करी सदा ॥२६॥जे आंत बाहेरी भरोनी उरले । अंतरीं निवोन विरालें ।परब्रह्मीं सहजाविले । नेणोंज काय ॥२७॥ऐसें साधुचें महिमान । साधतां कैचें उरेल मन ।कल्पा अवधीं करितां कथन । नव्हे पूर्ण पूर्णता ॥२८॥ऐसा साधु भेटेल तुज । तरी मीच होवोनि पावसी मजा ।जाईल सर्व संदेह आज । आपेंआप नाम्या ॥२९॥मग नामदेव म्हणे देवा । ऐसा साधु भेटेल जेव्हां ।तरी कैशापरी सेवावा । कृपानिधी तो ॥३०॥मगा बोलिले श्रीरंग । दैवत बुद्धीचा होईल त्याग ।तना मन अर्पोन चांग । शुद्ध सेवा करावी ॥३१॥तर्क वितर्क बाह्ममुद्रा । तेथें न चले गा भक्तनरेंद्रा ।तारीं तारीं या भवसमुद्रां । म्हणोनि शरण रिघावें ॥३२॥ते अंतर्बाह्य व्यापक । जाणतां सर्व लीला कवतुक ।जैसे त्यासी देखती देख । तैसे तयासी आज्ञापिती ॥३३॥भाग्यें जरी जोडती त्याचे चरण । तरी वर्तणूक आहे कठीण ।तें तुज सांगतों गुप्त खूण । सावधान ऐक पां ॥३४॥शरीर वेंचिलें तरी वेंचिजे । परी सद्गुरुवचन नुल्लंघिजे ।रात्रंदिवस राहिजे । आज्ञा संकेतीं ॥३५॥ज्यावरी गुरुची प्रीति । त्याची अनन्य भावें कीजें भक्ती ।आज्ञेवांचोनि कल्पांतीं । विरोध कोणासी न करावा ॥३६॥कां जरी तो सर्वांतरीं आहे । विरोध कोणाचा न साहे ।विशेष सद्गुरु जरी होये । तरी खेद न कीजे ॥३७॥अरे विरोधभाव असतां । तें चढे सद्गुरुच्या माथा ।जैसा घटभंग होतां । अमृत सांडे ॥३८॥ज्याशीं सद्गुरूची कृपा असे । त्यासि मानावें आम्ही ऐसें ।सर्वस्व जातां मानसें । न करिजे अंतर ॥३९॥देखे त्याचे ह्रदयांतरीं । सद्गुरु वसे निरंतरीं ।त्यासि खेद होतां भारी । अंतरे सद्गुरु ॥४०॥क्रोध ह्रदयीं भरला । तो आत्मस्थितीसी अंतरलाअ ।तोच गुरूचाअ घात केला । शिष्याहातीं ॥४१॥गुरुशिष्य तोचि निजबंधु । त्यासि स्वप्नीं न कीजे विरोधु ।करितां घडे गुरुवधु । शास्त्रवाक्य ॥४२॥तरी गा कार्याकारणें । बोलिजे तेंची घडावें वर्तणें ।एक होतां कोपायमानें । एक समाधान त्यास द्यावें ॥४३॥जो आपुल्या गुरूची स्तुती करी । त्याचे चरणा वंदावे शिरीं ।निंदा बोलतीये अवसरीं । निघिजे तेथोनी ॥४४॥गुरूसमीप न बैसिजे । गुरूसी वचना न बोलिजे ।आज्ञा मागोनी वंदिजे । कार्याकाराणें ॥४५॥देशीं आहे सद्गुरु । तिकडे कीजे नमस्कारू ।चंद्रकारणें चकोरू । तैसा भेटी इच्छिजे ॥४६॥गुरूसी अर्पिजे तन मन । गुरूसी अर्पिजे वित्त धन ।गुरूसी अर्पिजे चैतन्य । आनंदरूप ॥४७॥गुरुचे दोष गुण । मनें न कीजे उच्चारण ।जें जें गुरूचें आज्ञापन । मेरू ऐसें मानिजे ॥४८॥सज्जनाची संगती धरिजे । गुरूरूप विश्व मानिजे ।चित्तानुसार अर्पिजे । साधुजनांसी ॥४९॥ज्यासि सद्गुरु कोपला । तो साधु असतां खर वागाला ।ईश्वर जरी साह्म जाला । तरी काढों न शके ॥५०॥सद्गुरु आधीन सकळ देव । गुरु आधीन पितर मानव ।सद्गुरु पूजितां सर्व । आनंदातें पावती ॥५१॥ऐसें सद्गुरुचें महिमान । म्हणोनि ब्रह्म त्या आधीन ।तो जरी पतितासी देईल मान । तरी ब्रह्मपूर्ण तो होय ॥५२॥ऐसें जेणें आचारावें । तरी सद्गुरूसी शरण जावें ।नाहीं तरी करावें । नामस्मरण माझें पैं ॥५३॥तेणेंकरून कांहीं एक । निवारूं शकेल जन्मदुःख ।कोणें एक जन्मीं सद्गुरु देख । भक्ति करोनि पाविजे ॥५४॥चढाओढी ग्रुरु करिती । मग सुबुद्धिहि टाकिती ।त्यासी यमाघरीं प्राप्ति । खरत्वाची ॥५५॥सद्गुरुसेवा तें मोक्षपद । सद्गुरुसेवा तें आनंदपद ।सद्गुरुसेवा तो ब्रह्मावबोध । कैवल्यप्राप्ती ॥५६॥असो ऐसिया परी । जो सद्गुरु वाक्य वाहे शिरीं ।तोचि ब्रह्मविद्येचा अधिकारी । हरिहरां वंद्य तो ॥५७॥ऐसें नामदेवाप्रति श्रीहरी । स्नेह साक्षेपें निरूपण करी ।ऐकोनियां चराणावरी । सद्गदित होउनि लोटला ॥५८॥देवा तूं होवोनि माझी दिवटी । गुरुनिधान दाखवी दृष्टी ।जेणें करूनी भवबंध गांठी । सुटेल सर्वथा ॥५९॥मग कळवळोनी श्रीहरी । नामदेवातें पोटासी धरी ।जाय पावशील झडकरी । हस्त विसा खेचराचा ॥६०॥तेणे नाम्यासी समाधान । देवही जाला सुखासंपन्न ।नामा पावोनी ब्रह्मज्ञान । मिळशील माझ्य़ा स्वरूपीं ॥६१॥ऐसें हें देवभक्त निरूपण । प्रथम शिष्यासी करवी श्रवण ।मग दीजे पूर्णपण । म्हणे नामा ॥६२॥११२देव आणि नामा उभे भीमातीरा । प्रेमें येरयेरा आळविती ॥१॥देव म्हणे नाम्या ऐकें गुह्य गोष्टी । संसाराची तुटी जेणें होये ॥२॥श्रीगुरुवांचुनी मुक्ति तुज नाहीं । भवनदी डोहीं नुतरसी ॥३॥शरण गुरुसी जालिया सप्रेमें । संसाराचा श्रम उतरेल ॥४॥गुरुवांचुनियां कैंचा मुक्तिठाव । संसारा हा वाव कैसा होय ॥५॥म्हणूनि नाम्या तुवां गुरुसि जावें शरण । तेणें भवबंधनें मुक्त होती ॥६॥ऐसें ऐकोनियां नामा थरारिला । मूर्च्छागता जाला भूमीवरी ॥७॥भूमि लोळे नामा कंठ सद्गदित । डोळियां स्त्रवत अश्रुजळ ॥८॥इतुकें देखोनियां द्रवला पुरुषोत्तम । नाम्यासी सप्रेमें उचलिलें ॥९॥नाम्या तुज काय वाटतसे दुःख । संसाराचें सुख तुज जालें ॥१०॥नामा म्हणे देवा तुज ऐसा दाता । मज भवव्यथा कवणेपरी ।११॥११३अनाथांचा नाथ तुझी ब्रीदावली । मज कांरे जाळी भावव्यथा ॥१॥देव म्हणे नाम्या गुरुवांचुनियां । मुक्ति पावावया आन नाहीं ॥२॥आना नेणें कांहीं करिसी वित्पत्ती । नव्हे माझी प्राप्ती गुरुविण ॥३॥जाई नाम्या जाई गुरूसी शरण । तुटे भवबंधन तुझें वेगीं ॥४॥नामा म्हणे देवा कवणा शरण जाऊं । कोणा मी होऊं शरणागत ॥५॥११४देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी । शरण तयासी जावें वेगीं ॥१॥इतुकें ऐकोनि नमियेलें देवा । चालयेलाअ तेव्हां विसोबापाशीं ॥२॥चिंताग्रस्त नामा आला आंवढयासी । पुढें देऊळासी देखियेलें ॥३॥नामा तये काळीं गेला देऊळासीं । देउळीं कौतुकासी देखियेलें ॥४॥११५देवावरी पाये ठेउनि खेंचर । निजेला परिकर निवांतचि ॥१॥देखोनियां नामा पावला विस्मया । कैसा हा प्राणिया देवो नेणें ॥२॥उठी उठी प्राण्या आंधळा तूं काये । देवावरी पाय ठेवियेले ॥३॥विसोबा खेचर बोले नामदेवाअ । उठविले जिवा कांरे माझ्या ॥४॥देवाविण ठाव रिता कोठें आहे । विचारुनि पाहे नामदेवा ॥५॥जेथें देव नसे तेथें माझे पाय । ठेवीं पां अन्वय विचारुनी ॥६॥नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव । कोठें रिता ठाव न देखेची ॥७॥११६इतुकें देखोनि चरणीं घाली मिठी । सांठवला सृष्टी अवघाअ देव ॥१॥तिहीं त्रिभुवनीं आपण व्यापुनी । आनंदें कोंडोनि राहियेला ॥२॥श्रीगुरुचे पाय जीवें न विसंबत । मनोवृत्तिसहित ओंवाळिलें ॥३॥डोळियांचे डोळे उघडिलें जेणें । आनंदाचें लेणें लेवविलें ॥४॥जन्ममरणांचें तोडिले सांकडें । कैवल्यचि पुढें दावियेलें ॥५॥कैवल्याचा गाभा विटेवरी उभा । दिसे दिव्या शोभा पांडुरंग ॥६॥नामा म्हणे माझी भक्ति हे माउली । कृपेची साउली केली मज ॥७॥११७सर्वा कालीं परमात्मा आहे सर्व देशीं । भावना हे अहर्निशीं दृढ धरी ॥१॥संतसमुदाय मिळती जेथें जेथें । जाये तेथें तेथें लोटांगणीं ॥२॥चिंताअ न करी नाम्या येणें तरसी जाण । तुज सांगितली खूण निर्वाणींची ॥३॥११८खेचरें केली माव लिंगावरी देउनि पाव । पहावया भाव नामयाचा ॥१॥नामा तेथें आला देव नमस्कारिला । देखोन बोलला वचन त्यासी ॥२॥लिंगावरोनि चरण काढाजी वहिले । दिसतां वरी भले करणीं न कळे ॥३॥तंव येरू बोलिला नाम्या तूं भला । मज नाहीं कळला देव तुझा ॥४॥जेथें नाहीं देव तेथें ठेवी पाव । सर्वज्ञ सदैव तूंची अससी ॥५॥मीपणें भुललों मज नकळेची कांहीं । देव नसे ते ठायीं पाय ठेवीं ॥६॥तंव नामा होय विचारिता शब्दांची कुसरी । पाहतां निर्धारीं सान नोहे ॥७॥देवाविण ठाव हें बोलणेंची वाव । परतोनि संदेह पडला मज ॥८॥आपुलें उमाणें आपण उमगावें । मजसी तारावें भवसागरीं ॥९॥नामा धरी चरण अगाध तुमचें ज्ञान । आपुलें नाम कोण सांगा स्वामी ॥१०॥येरु म्हणे खेचर विसा पैं जाण । लौकिका मिरविणें अरे नाम्या ॥११॥नाम आणि रूप दोन्ही जया नाहीं । तोचि देव पाही येर मिथ्या ॥१२॥जळ स्थळ आणि काष्ट हे पाषाण । पिंड ब्रह्मांड व्यापुन अपुरेणु। ॥१३॥सर्वत्र साक्षभूत हें जाणोनि पाहो । खेचर म्हणे नाम्यातें अवघा देवो ॥१४॥११९नामदेवा काय करिसी तीळ । उभा अगा ठेलासी दर्भ जैसा ॥१॥भुका कागा मरसी जेथिंचा तेथें । केशवराज तूतें आतुडेना ॥२॥नाहीं दया ध्यान ईश्वरीं भजन । वायांविण प्राण कां करितीसी ॥३॥हरिभक्तिविण जन्मालासी नरू । म्हणे विसोबा खेचरू अरे नाम्या ॥४॥१२०तुझें निजसुख तुजपाशीं आहे । विचारूनि पाहे मनामाजीं ॥१॥विवेक वैराग्य शोधुनियां पाहे । तेणें तुज होय ब्रह्मप्राप्ती ॥२॥ज्ञानाचा प्रकार सहजची जाला । अहंभाव गेला गळोनियां ॥३॥खेचर विसा म्हणे जेथें ओंकार निमाला । सहजचि जाला ब्रह्ममूर्ती ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP