मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीनामदेव चरित्र| अभंग १०१ ते ११० श्रीनामदेव चरित्र अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० श्रीनामदेव चरित्र - अभंग १०१ ते ११० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग १०१ ते ११० Translation - भाषांतर १०१उद्धिग्न मनीं करी दीर्घ ध्वनी । नाहीं माझें कोणी सखे ऐसें ॥१॥वैराग्य कसवटी सोसवेना घाये । पळावया पाये मार्ग काढी ॥२॥जाले चाळाचूळ मनांत चंचळ । युगा ऐसें पळ वाटतसे ॥३॥नामा म्हणे जावें पळोनियां आतां । संतसंग होतां भाजतील ॥४॥म्हणे मुक्ताबाई चैतन्याचा केर । ब्रह्म अग्नीवर चेतवावा ॥५॥१०२अंतर बाहेर भाजूं आम्ही कुंभ । भरू निरालंब सगळेची ॥१॥अहं सोहं उर्ध्व लाउनी फुंकणी । नेत्रद्वारें फुंकुनी जाळ करूं ॥२॥जीवित्व काढुनि शिव घडूं अंगा । प्रिय पांडुरंग आवडेला ॥३॥म्हणे मुक्ताबाई पळायाचें पाही । आसन स्थिर नाहीं नामयाचें ॥४॥१०३न पुसतां संतां निघालाअ तेथुनी । पैलपार इंद्रायणी प्राप्त जाला ॥१॥मागें पुढें पाहे पळत तांतडी । आला उठाउठी पंढरिसी ॥२॥कळवळोनि कंठी धरिली विठल मूर्ती । नको देऊं हातीं निवृत्तीच्या ॥३॥ज्ञानदेव सोपान बोलाविला गोरा । जुनाट म्हातारा जाळूं आला ॥४॥मुक्ताईनें तेथें माजविली कळी । हे संत मंडळी कपटी तुझी ॥५॥नामा म्हणे देव आणिलें पूर्व दैवें । गेलों असतों जीवें सगळाची ॥६॥१०४पूर्वीं तुझी कांहीं केली होती सेवा । उपयोगा देवा आली आजी ॥१॥अनंता जन्मींचें फळलें अनुष्ठान । पाहिले चरण विठो तुझे ॥२॥न जाणों माझ्या येतील पाठोपाठीं । घालतील मोठी भीड तुज ॥३॥त्यासी द्याल तुम्ही अगत्य उदारा । मातें कां न मारा आपुले हातें ॥४॥नामा म्हणे तुझे न सोडी चरण । युगायुगींज धरणें घेतलें असे ॥५॥१०५हातांत नरोटी जीर्ण वस्त्र भार । म्हणसी सवदागर संत माझे ॥१॥परळ भोपळा गृहामाजी संपत्ति । भूषण कां श्रीपती सांगतसां ॥२॥भणंगाचे घरां नित्यची राजपट । सांगसी अचाट ब्रीद त्यांचें ॥३॥कैकाडयाचे वानी करिती गुडगुड । मजाला हें गूढ उमजेना ॥४॥नामा म्हणे गाती प्रकाशाचें गाणें । आम्हां अघोरवाणें दिसतसे ॥५॥१०६म्हणती घेतल्या आम्हीं धनाचिया कोडी । खर्चायला कवडी थार नसे ॥१॥रडती पडती येरांवरी येर । आनंदाला पार नाहीं म्हणती ॥२॥काय गुणें देव रिझाला त्यावरी । नेसाया फटकुरीं जन्म गेला ॥३॥पाहोन दरिद्र जालोंज कासाविस । केवळ परीस ते पांढरेच ॥४॥लहानशी मुक्ताई जैसी सणकांडी । केले देशोधडीं महान संत ॥५॥सगळेंची काखेसी घेई ब्रह्मांड । नामाअ म्हणे पाखांड दिसतें मज ॥६॥१०७पांचा सातांचा आहे येक जागां मेळा । देताती कवळा येकयेकां ॥१॥करू पाहातां मज जिताची विटंबना । म्हाणोनी नारायेणा पळोनी आलों ॥२॥पाहिला तयाचा मानस आदर । जमा केला केर जाळावयाअ ॥३॥त्यांच्या धाकें मागें आलों रे अनंता । येत तुझ्या चित्ता बरें त्यांचें ॥४॥नामा म्हणे जीवें आलों वांचवोनी । अझुनि तरी चक्रपाणि वांचवी मज ॥५॥१०८आहे त्यांचे मनीं करावें आगमन । घेतील मागुन तुजपाशीं ॥१॥त्यावेळीं तुम्ही व्हाल जी बेभान । द्याल जी काढोन संतापासीं ॥२॥खादल्या जेविल्याचें राखावें स्मरण । तुला माझी आण पांडुरंगा ॥३॥चालविला लळा पुरविली आवडा । आतां कां दगडा जड जालों ॥४॥कां माझी चिंता सांडिली अनंता । संताहातीं देतां हरुष वाटे ॥५॥नामा म्हणे काये करिसी अमंगळ । अडचणी राउळामाजीं जाली ॥६॥१०९वटारोनि डोळे पाहती आकाश । मज त्याचा भासा कळों नेदी ॥१॥भाजा भाजा म्हणोनि उठली एकसरांज । मग म्यां बाहेरां गमन केलें ॥२॥आतां यांजवरी द्याल त्यांचे हातीं । होऊं पाहाती माती जीवित्वाची ॥३॥अभयाचें दान द्यावें बा श्रीहरी । दुर्बळ बाहेरी घालूं नये ॥४॥समर्था लांच्छान लागतें नांवाचें । न जाणों देवाचें असेल कांहीं ॥५॥नामा म्हणे नांव पतितपावन । तेया बोला उणें आणूं नये ॥६॥११०संतांसी विन्मुख जालासी गव्हारा । नाहीं आतां थारा इहपरलोकीं ॥१॥नाहीं वेडया संतांचा अंगवळा । झोंप बैसली डोळां अज्ञानाची ॥२॥भ्रांतीनें तुझी पुरविली पाठी । सज्जनाच्या गोष्टी कडू जाल्या ॥३॥हाता आला लाभ गमाविला सारा । भुललासी गव्हारा भ्रमभूली ॥४॥मोह सर्पें तुझें व्यापियेलें अंग । म्हणे पांडुरंग काय आतां ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP