मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नाममहिमा| अभंग १४१ ते १५० नाममहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६३ नाममहिमा - अभंग १४१ ते १५० संत नामदेवांनी गंगा नदीचे माहात्म्य इतके छान वर्णन केले आहे की, जणू प्रत्यक्ष गंगास्नानाचा भास होतो. Tags : abhangbooknamdevअभंगगंगामाहात्म्यनामदेवपुस्तक अभंग १४१ ते १५० Translation - भाषांतर १४१नाहीं भक्ती नामीं चांडाळ पातकी । तोचि जाणावा लोकीं दुष्ट नष्ट ॥१॥प्रपंचीं कर्दमीं गढोनियां ठेले । न निघती बोले संताचिया ॥२॥काढितां त्या वाटे प्रपंचाचें दुःख । विषयाचें सुख हर्ष बहु ॥३॥पुत्र वित्त कांता मानी भरंवसा । पडे मोह फांसा जन्मवरी ॥४॥नामदेव म्हणे अंतीं आहे कोण । कळा नामाविण नानापरी ॥५॥१४२नाम हं अमृत भक्तांसी लाधलें । आपण घेतलें बौध्यरुप ॥१॥नाम हें आळवा नाम हें आळवा । होईल दोहावा कामधेनु ॥२॥न बाधेल विघ्न प्रपंच हें भान । नाम हेंचि खूण वैकुंठींची ॥३॥नामा म्हणे जीव ब्रह्म असे सर्व । हा गीतेमाजीं भाव सांगितला ॥४॥१४३आलिया संसारीं आत्माराम मुखीं । घेतलिया सुखी त्रिभुवनीं ॥१॥जपोनियां नाम आपुलेंचि आधीं । मग सोहंसिद्धि सर्व साधे ॥२॥सर्व हरी मग नाहीं दुजा भाव । प्रापंचिक गर्व दिसेचिना ॥३॥नामदेव म्हणे सर्वही साधनें । भासे जन वन परब्रह्म ॥४॥१४४व्यापकं तें नाम तेव्हांच होईल । जेव्हां ओळखेल मीपणासी ॥१॥आपुलेंचि नाम न ओळखिलें । व्यापक साधिलें जायेचिना ॥२॥आपुलीच ओळख आपणासी पडे । मग सर्वत्र जोडे नाम तेव्हां ॥३॥नामाविण नाम तेंचि होय विभ्रम । नामदेव म्हणे संताम पुसा ॥४॥१४५आसनीं शयनीं जपतां चक्रपाणि । लाविली निशाणी वैकुंठींची ॥१॥नाहीं रे बंधन आम्हां हरिभक्तां । गीतीं गुण गातां राघोबाचि ॥२॥भवसिंधूची जिवा जाली पायवाट । जे गर्जती उद्धट नामघोष ॥३॥प्रेमें वोथरत हर्षे पिटूं टाळी । नाम ह्रदयकमळीं विठोबाचें ॥४॥नाहीं काया क्लेश न करी सायास । दृढ धरी विश्वास हरीनामीं ॥५॥नामा म्हणे साधन न लगे अनेक । दिली मज भाक पांडुरंगें ॥६॥१४६राम मंत्राचिया आवर्ती । घडती जयासी पुढतोपुढती ।त्याचा जन्म धन्य ये क्षितीं । सर्व कुळाशीं तारक ॥१॥राममंत्र आवडे जीवा । हाचि उद्धार सर्व जीवां ।शिवासही विसावा । पार्वती सहित ॥२॥रामकृष्ण उच्चारे । तरती जड पामरें ।ऐसें हें व्यासें निर्धारेम । नानाग्रंथीं सांगितलें ॥३॥नामा जपे नाम मंत्र । आणिक नेणे नाना शास्त्र ।रामनामें नित्य वक्त्र । हरी रंगें रंगलें ॥४॥१४७विठोबाचे पाय जन्मोनि जोडावे । संबंधी तोडावे कामक्रोध ॥१॥ऐक्य सुख घ्यावें एकविध भावें । प्रेम न संडावें आवडीचें ॥२॥अनंत जन्मा यावें ऐसें भाग्य व्हावें । एक वेळाम जावें पंढरीसी ॥३॥वृत्तिसहित मन पायींच ठेवावें । अद्वैत भोगावें प्रेमसुख ॥४॥देहीं देहभाव प्रकृति दंडावें । सांडणें सांडावें ओवाळुनी ॥५॥नामा म्हणे ऐसें घेतलें माझ्या जिवें । विठोबा पुरवावें आर्त माझें ॥६॥१४८तुझाचि अहंकार तुजचि नाडील। मागुता मांडील संसारु हा ॥१॥सांडी सांडी मोहो विषय टवाळ । वाचेसी गोपाळ उच्चारी रे ॥२॥सर्व हे भुररे मायेचें घरकुलें । अहंकारें नाथिलें नानायोनी ॥३॥नामा म्हणे भजन हरीचें करीन । नित्य ते सेवीन चरनरज ॥४॥१४९देहधर्म विहित करी । द्वैतभाव चित्तीम न धरी ।सर्वाभूती नमस्कारी । एक आत्मा म्हणोनियां ॥१॥एक तत्त्व एक हरि । एकचि तो नमस्कारी ।आदि अंतींचा नरहरि । सकळ कुळांसी तारील ॥२॥पवित्र त्याचेंचि कुळ । आचार त्याचाचि सुशीळ ।अखंड जपे सर्वकाळ । रामकृष्ण नरहरि ॥३॥नामा जपे नाम मंत्र । अखंड हरि नाम सहस्त्र ।हाचि आमुचा निज मंत्र । रामकृष्ण गोविंद ॥४॥१५०सुलभ सोपारें नाम केशवाचें । आठविताम वाचे दोष जाती ॥१॥अनाथाचा सखा उभा नामापासीं । ऐसा तो प्रेमासी भुललासे ॥२॥जातिवंत आम्ही वेदाचे पाठक । तरी सर्व फिकें नामाविण ॥३॥नामा म्हणे नामीं रंगलों सतत । म्हणोनि अनंतें दिधली भेटी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP