मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नाममहिमा| अभंग २१ ते ३० नाममहिमा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६३ नाममहिमा - अभंग २१ ते ३० संत नामदेवांनी गंगा नदीचे माहात्म्य इतके छान वर्णन केले आहे की, जणू प्रत्यक्ष गंगास्नानाचा भास होतो. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग २१ ते ३० Translation - भाषांतर (२१)नांदतसे नाम आकाश पाताळीं । सर्व भूमंडळीं घनदाट ॥१॥पाताळ फोडोनि किती आहे पुड । नाहीं आंत वाड नभ वरी ॥२॥चौर्यांशी भोगिती दुर्मति पामर । नाहीं सारासार जाणत तें ॥३॥नामदेव म्हणे नाम अविनाश । तेथें नाना वेष नाम सर्व ॥४॥(२२)तरले तरतील हा भरंवसा । पुढती न येती गर्भवासा ॥१॥वाट सांपडली निकी । विठठल नाम ज्याचे मुखीं ॥२॥तीर्थे इच्छती चरणीचें । रज नामधारकाचें ॥३॥प्रायश्चित सोडोनीं प्रोढी । जाली दीन रुपें बापुडीं ॥४॥ऋद्धी सिद्धी महाद्धारीं । मोक्ष वोळंगण करी ॥५॥नामा म्हणे सुखनिधान । नाम पतित पावन ॥६॥(२३)तपें दानें व्रतेम यज्ञाचिया कोडी । तुकितां जालीं थोकडीं हरिनामें ॥१॥न पुरे त्यांसी घातलीं त्रिभुवनींची तीर्थे । नयेची पुरतें रामनामेंसी ॥२॥नाहीं या जीवांचें बोलणें शिवाचें । उपदेशिलें वाचे शक्तिप्रती ॥३॥नाम नाहीं वाचे हाचि पै निषेधु । विधी हा गोविंदु स्मरलिया ॥४॥श्रेष्ठ सर्व नाम शिवाचें बोलणें । युक्ति अनुमानें न बोले कांहीं ॥५॥नामेंचि भक्त ते पावले अपार । नामें पतित नर उद्धरले ॥६॥नामें पशु गजेंद्राचा तो उद्धार । वाल्मिकें विचार हाचि केला ॥७॥गगनीं धुरु केला अढळ नामें देखा । नामेंचि गणिका उद्धरली ॥८॥नामें ते आपदा न बाधी प्रल्हादा । मुखीं नाम सदा उच्चारितां ॥९॥कृपाळू नाम पैं मेघ हाचि सार । भीष्में युधिष्ठिरा उपदेशिलें ॥१०॥हरिनामापरतें नाहीं विचारीतां । नवमाध्यायी गीता कृष्ण सांगे ॥११॥सकल अमृत श्रीहरींचे नाम । त्यामाजीं उत्तम राजनाम ॥१२॥म्हणोनी सदाशिवेम धरिलें मानसीं । हेंचि गिरिजेसी उपदेशिलें ॥१३॥तारक ब्रह्ममंत्र राजनाम जाण । विश्वनाथ श्रवण करीतसे ॥१४॥कीर्तन श्रवण हेंचि पै हो काशी । म्हणोनी मानसीं राम जपा ॥१५॥विरंची सकळ शास्त्र विचारितां । हरिनामापरता मंत्र नाहीम ॥१६॥कळिकाळा त्रास हरिनामकीर्तनें । पतितपावन प्राणी होय ॥१७॥कलियुगीं धर्म हरीचें हें नाम । म्हणोन शुकदेवें वाखणिलें ॥१८॥नामयाचा स्वामी पंढरीचा रावो । रुखमाईचा नाहो गाऊं गीतीं ॥१९॥(२४)चंद्रतारांगण नैऋति भास्कर । ततस्थ निर्धार ब्रह्मादिक ॥१॥ब्रह्मादि सकळ भजनीं तत्पर । तेव्हां हरिहर नाचतसे ॥२॥कृष्ण विष्णु नाम अच्युत अनंत । सगुण निश्चित स्मरा वेगीं ॥३॥नामा म्हणे नको उदंड सायास । तोडी भवपाश राजनामें ॥४॥(२५)सुखाचा सोहळा वाटतसे जीवा । भेटणें केशवालागीं आजी ॥१॥पाउलां पाउलीं याचिया वाटे । पताकांचे थाट दिसताती ॥२॥पैल तो कळसू पाहे पां साजणी । नामघोष कानीं पडतसे ॥३॥नामा म्हणे नामीं पारणें जो करी । तयासि श्रीहरी उपेक्षिना ॥४॥(२६)नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । ऐसेम बोले वाणी वेदशास्त्रीं ॥१॥पहा विचारोनि अनुभव तो मनीं । नका आडरानीं झणीं भरो ॥२॥नामाविणे कोणी तरले जे म्हणति । ते आधीं बुडती भवसागरीं ॥३॥नामा म्हणे नाम ॐकाराचें मूळ । ब्रह्म तें केवळ विटेवरी ॥४॥(२७)सार पैं सांगत उपनिषद तुम्हां । वाचे रामनामा जप करा ॥१॥हेंचि पैं मथित सांगोनियां गेले । उच्चारितां ठेले ब्रह्मरुप ॥२॥ज्योतिसी ते ज्योति भजन करील । आपणचि होईल हरी स्वयें ॥३॥नामा म्हणे कैसें विपरीत करणें । भूतदया धरणें सर्वाभूतीं ॥४॥(२८)अखंड मुखीं रामनाम । धन्य तयाचाचि जन्म ।स्नान संध्येसी नेम । तो पुरुष महापवित्र ॥१॥धन्य धन्य तयाचा जन्म । रामार्पण अवघें कर्म ।तोचि तरला हाचि नेम । रामकृष्ण उच्चारणीं ॥२॥अनंत जन्माचे सांकडें । तेणेंचि उगविलें कोडें ।जप तप येणें नावडे । रामकृष्ण उच्चारनीं ॥३॥नामा म्हणे नाममात्रें । अवघीं निवारलीं शस्त्रें ।रामकृष्ण नाम वक्त्रें । उच्चारी तो धन्य ॥४॥(२९)सह्स्त्र दळांमधुन अनुहातध्वनि उठी । नामाचेनि गजरें पातकें रिघालीं कपाटीं ॥१॥जागा रे गोपाळांनों रामनामीं जागा । कळिकाल एका नामें महादोष जाति भंगा ॥२॥दशमी एक व्रत दिंडीचें करा दर्शन । एकादशी उपवास तुम्ही करा जागरण ॥३॥द्वादशी साधनें जळती पातकांच्या कोटी । नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठीं ॥४॥(३०)सर्वांभूतीं हरी आहे हेंचि साच । मायाजाळ न छळे भाविकांसी ॥१॥सर्व ब्रह्म ऐसे वेद बोले गाढा । ब्रह्मींचा पवाडा अगम्य तो ॥२॥जाणतां नेणताम हरीनाम उच्चार । मार्ग तो साचार सुफल सदा ॥३॥नामा म्हणे कारण जिव्हा होय स्मरण । सर्व नारायण हरी दिसे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP