हरिपाठ - अभंग २६

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


एकतत्वनाम असुन त्यानेंच हरीला करुणा येईल

एक तत्वनाम दृढं धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी ॥१॥

सदगदितवाचेने नाम जपावें

तें नाम सोपा रे रामकृष गोविंद । वाचेसि सदगद जपे आधी ॥२॥

दुसर्‍या पंथाला जाऊं नको

नामापरते तत्त्व नाही रें अन्यथा । वांया आणिका पंथा जाऊं नको ।\३॥

ज्ञानेश्वर महाराजांचे अंतःकरणांत मौनाची जपमाळ असुन त्याला घरुन त्यांनी सतत हरिनामाचा जप केला

ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरीं । धरोनी श्रीहरी जपे सदां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP