हरिपाठ - अभंग १५

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


एक नामच हरी

एक नाम हरी द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥

समबुद्धिनामांत श्रीहरी समान होतो

समबुद्धी घेतां समान श्रीहरी । शमदमावरी हरी झाला ॥२॥

देहादेही आणि सर्वा घटीं सहस्त्ररश्मी सुर्यप्रकाश एक रामच आहे.

सर्वाघटीं राम देहादेही एक । सुर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ॥३॥

ज्ञानेश्‍वरमहारांजांचे चित्तांत हरिपाठाचा नेम असल्याने ते मागले जन्मीच मुक्ती झाले.

ज्ञानदेव चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलीया जन्म मुक्त झालो. ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP