गणपतीची आरती - शंकरतनया भवभयहरणा पंचारती...
Ganapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - शंकरतनया भवभयहरणा
शंकरतनया भवभयहरणा पंचारती तुजला॥
करितों भावे विघ्नहरा हे तारी भक्तांला॥धृ.॥
प्रेमानंदे सर्व लोक स्मरती पदकमला॥
गिरिजांकी तू बैसूनि नाना दाखवसी लीला॥
अवतरलासी भक्तजनासी मुक्ती द्यायाला॥
विठ्ठसुत बलवत्वकवि ध्यातो भवाब्धि तरण्याला॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2012
TOP